Pune rain : पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांना आणखी दोन दिवस थांबावं लागणार; काय म्हटलं वेधशाळेनं? वाचा सविस्तर…

| Updated on: Jun 19, 2022 | 5:40 PM

21 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 21 जूनपर्यंत विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात 22 जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग विलग होण्याची शक्यता आहे.

Pune rain : पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांना आणखी दोन दिवस थांबावं लागणार; काय म्हटलं वेधशाळेनं? वाचा सविस्तर...
पाऊस
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यात 20 जूनपर्यंत हलका पाऊस सुरू राहील. मात्र 21 जूनपासून पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 21 जूनपासून घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. काल शहरात शिवाजीनगर परिसरात काहीसा पाऊस पडला. मात्र शहराच्या अनेक भागांत शनिवारी ढगाळ (Cloudy) वातावरण होते. त्यावर अनुपम कश्यपी यांनी हवामानाची सध्याची स्थिती आणि पाऊस याविषयी माहिती दिली. नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राला अजून पूर्ण कव्हर केलेले नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, कोकण आणि गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 22 जूनपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनची स्थिती काय?

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मान्सूनची उत्तर सीमा (NLM) पोरबंदर, भावनगर, खंडवा, गोंदिया, दुर्ग आणि भवानीपटना, कलिंगपट्टणम, हल्दिया, वर्धमान, दुमका, बांका आणि मोतिहारीमधून जाते. शनिवारपर्यंत, नैऋत्य मान्सून संपूर्ण पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात, वायव्य बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. मध्य प्रदेशातील आणखी काही भाग, विदर्भाचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालच्या उपसागरात, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा आणखी काही भाग, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

हे सुद्धा वाचा

जून महिन्यात पुण्यासह राज्यातही पावसाची तूट

21 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 21 जूनपर्यंत विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात 22 जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग विलग होण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसेल, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात जूनमध्येच 59 टक्क्यांची कमतरता नोंदवली गेली आहे तर पुणे जिल्ह्यात जून महिन्यात 65 टक्के तूट नोंदवली गेली आहे.