पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; शिवसेनेचा नेता संतापला

| Updated on: Apr 20, 2021 | 7:44 AM

विरोधकांच्या आरोपांना तोंड देताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारची (Thacekray govt) आणखीनच कोंडी झाली आहे. | Covid centre in Pune

पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; शिवसेनेचा नेता संतापला
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

पुणे: पुरंदर तालुक्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्यामुळे शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना तोंड देताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारची (Thacekray govt) आणखीनच कोंडी झाली आहे. (Shivsena leader vijay shivtare on remdesivir shortage in purandar)

ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदर जिल्ह्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. तसेच ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास आपण रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन करु, असा इशाराही शिवतारे यांनी दिला.

माझी भूमिका ही महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात नाही. मी प्रशासनावर नाराज आहे. जिल्हाधिकारी, FDA यांच्या कामावर माझा आक्षेप आहे. पुरंदर जिल्ह्यात कोरोनाचे 1800 रुग्ण असताना केवळ 225 रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळाली. लसीकरणाबाबतही पुरंदर जिल्ह्यासोबत अन्याय झाला, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.

राज्यात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी ग्रीन कॉरिडोअर

आजघडीला कोरोनाचा संसर्ग अनेक ठिकाणी वाढत असून, ऑक्सिजनची कमतरताही भासत आहे. परिणामी विविध वाहनांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेला जात आहे. मात्र ऑक्सिजन वाहून नेताना त्या वाहनास टोलनाक्यांसह कुठेही अडविण्यात येऊ नये. त्या वाहनास टोल आकारला जाणार नाही, अशा आशयाचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वयंघोषित पास योजनेत लाल रंगातील आरोग्य सेवेशी संबंधित वाहनांना प्राधान्य देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून ठिकठिकाणी विशेष मार्गिके ची व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) केली आहे. टोल नाके किंवा नाकाबंदीदरम्यान ही वाहने खोळंबू नयेत यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र मार्गिका आरक्षित केली होती. तर काही ठिकाणी विरुद्ध दिशेच्या मार्गिके वरूनही वाहने सोडण्यात आली.

संबंधित बातम्या:

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

Coronavirus: देशातील परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; दिल्लीत एका आठवड्याचा कर्फ्यू

रुग्णांना त्रास दिला तर खैर नाही; महापौर पेडणेकर वॉर रुममधील कर्मचाऱ्यांवर भडकल्या

(Shivsena leader vijay shivtare on remdesivir shortage in purandar)