AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णांना त्रास दिला तर खैर नाही; महापौर पेडणेकर वॉर रुममधील कर्मचाऱ्यांवर भडकल्या

नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या आणि त्यांना मदत न करणाऱ्या वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज चांगलंच धारेवर धरलं. (mayor kishori pednekar visits r north war room in mumbai)

रुग्णांना त्रास दिला तर खैर नाही; महापौर पेडणेकर वॉर रुममधील कर्मचाऱ्यांवर भडकल्या
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
| Updated on: Apr 19, 2021 | 12:35 PM
Share

मुंबई: नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या आणि त्यांना मदत न करणाऱ्या वॉर रूममधील कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज चांगलंच धारेवर धरलं. मुंबईकर आधीच त्रस्त आहेत. त्यात त्यांना अधिक त्रास द्याल तर याद राखा, तुमची खैर करणार नाही, असा दमच किशोरी पेडणेकर यांनी भरला. महापौर पेडणेकर या कर्मचाऱ्यांवर प्रचंड भडकल्या होत्या. महापौरांचं हे रौद्ररुप पाहून अधिकाऱ्यांचीही पळापळ झाली. (mayor kishori pednekar visits r north war room in mumbai)

दहिसरच्या आर नॉर्थ विभागातील कोविड वॉर रूममधून योग्य प्रतिसाद मिळत नाहीत. फोनही उचलेल जात नसल्याच्या तक्रारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनीही या वॉर रुमला फोन केला होता. चौथ्यांदा फोन केल्यावर त्यांचा फोन उचलला गेला. त्यांनी कोरोनाची माहिती घेतानाच एका कोरोना रुग्णाचा नंबर दिला. मात्र, त्यानंतर वॉर रुमकडून त्यांना काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे महापौरांनी आज थेट या वॉर रुमला भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

महापौर भडकल्या

तुमच्या वॉर रुमच्या माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मी स्वत: खातरजमा केल्यानंतर त्यात तथ्यं आढळलं. मी महापौर असल्याचं सांगूनही तुम्ही मला अशी वागणूक देत असाल तर सर्व सामान्यांना काय वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका. त्यांना सर्व सुविधा नीट मिळाल्या पाहिजे. त्या दिल्या नाही तर याद राखा, तुमची खैर करणार नाही. केवळ फोनवरुन व्यवस्थित माहिती देण्याचचं तुमचं काम आहे. तेवढंही तुम्हाला करता येत नाही का?, असा सवाल पेडणेकर यांनी केला.

मुंबईकरांसाठी सर्व यंत्रणा

मुंबईत कोरोनाचे रुग्ण संख्याही वेगाने वाढत आहे मुंबई रुग्णांना बेडसाठी तास न् तास थांबावं लागत आहे. मुंबई महापालिकेने तयार केल्यावर रुममध्ये फोन केला तर योग्य उत्तर मिळत नाही. ही सर्व यंत्रणा मुंबईकरांसाठी उभी केलेली आहे, त्याचा फायदा मुंबईकरांना मिळाला पाहिजे अशा शब्दात महापौरांनी समज दिली.

200 मॅट्रीक टन ऑक्सिजन मिळणार

लसी अभावी काल पुन्हा 35 लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. पण केंद्र सरकार पॉझिटिव्ह आहे. आपल्याला लवकर लस उपलब्ध होईल. मुंबई आज किंवा 200 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या छोट्या रुग्णालयात आता लिक्विड ऑक्सिजन तयार करत आहोत. मुंबईत बेडची कमतरता आहे, बाहेरून येणार रुग्ण सुद्धा मुंबईत अधिक आहेत. नवीन कोविड सेंटर आठ दिवसात तयार होतील, असं महापौरांनी सांगितलं. (mayor kishori pednekar visits r north war room in mumbai)

संबंधित बातम्या:

VIDEO | लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, बुलडाण्याच्या ठाणेदाराची सटकली

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला? यादी जाहीर, तुमचं नाव तपासा!

(mayor kishori pednekar visits r north war room in mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.