Pune Metro : महा-मेट्रोला रेंज हिल्स डेपोमध्ये मिळाला सातवा रेक; गाड्यांच्या देखभालीसाठी डेपोमध्ये सर्व सुविधा, महामेट्रोची माहिती

प्रदीप गरड

Updated on: Aug 22, 2022 | 7:30 AM

दिवाणी न्यायालय हे सर्वात खोल भूमिगत स्थानकांपैकी एक आहे. याची रेल्वे पातळी जमिनीच्या खाली सुमारे 28 मीटर आहे. केंद्रीय स्कायलाइट भूमिगत स्टेशनच्या प्लॅटफॉर्म स्तरापर्यंत नैसर्गिक प्रकाश प्रदान करतो.

Pune Metro : महा-मेट्रोला रेंज हिल्स डेपोमध्ये मिळाला सातवा रेक; गाड्यांच्या देखभालीसाठी डेपोमध्ये सर्व सुविधा, महामेट्रोची माहिती
महा-मेट्रोला रेंज हिल्स डेपोमध्ये सातवा रेक मिळाला, त्यावेळी मेट्रोचे कर्मचारी
Image Credit source: HT

पुणे : महा-मेट्रोला (Maha metro) 18 ऑगस्ट रोजी रेंज हिल्स डेपोमध्ये 7वी तीन डब्यांची ट्रेन (34 ट्रेन सेट) मिळाली. हा पहिला ट्रेन सेट आहे, जो रेंज हिल्स डेपोमध्ये प्राप्त झाला आहे. कारण यापूर्वीचे सहा ट्रेन सेट हिल व्ह्यू येथे प्राप्त झाले होते. पार्क कार डेपो आणि वनाझ-गरवारे विभागादरम्यान ते वापरात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेंज हिल्स डेपोला मिळालेला रेक चालू केला जाईल आणि नंतर तो फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय विभागादरम्यानच्या चाचण्यांसाठी वापरला जाईल, असे महा-मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. रेंज हिल्स डेपोही (Range Hills depot) पूर्णत्वाकडे आहे. डेपोमध्ये गाड्यांच्या देखभालीसाठी सर्व सुविधा आहेत. रेंज हिल्स डेपोमध्ये ऑपरेशन आणि कमांड सेंटरदेखील (OCC) आहे. ओसीसी हे संपूर्ण 33.2 किमी मेट्रो मार्गावरील गाड्यांच्या देखरेख आणि नियंत्रणासाठी मुख्य नियंत्रण केंद्र आहे.

पुरेशा पार्किंगचे नियोजन

महा-मेट्रोने रस्ता क्रॉसिंग टाळण्यासाठी प्रवाशांना शिवाजीनगर न्यायालयात जाण्यासाठी भुयारी मार्गाची योजना आखली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या कार्यरत असलेल्या स्थानकांवर जागेची कमतरता लक्षात घेऊन पार्किंगची समस्या टाळण्यासाठी, महा-मेट्रोने शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालय स्थानकावर पुरेशा पार्किंगचे नियोजन केले आहे, हे इंटरचेंज हब असेल.

दिवाणी न्यायालय स्थानकासाठी दोन प्लॅन

महा-मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाणी न्यायालय स्थानकावर दोन टप्प्यात एकूणच मास्टर प्लॅन विकासाचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात लाइन-1 आणि लाइन-2चे फक्त इंटरचेंज स्टेशन असेल जे डिसेंबर 2022पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. दुसरा टप्पा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून परिकल्पित आहे, ज्यामध्ये 10 लाख चौरस फूट व्यावसायिकांसह तीन मेट्रो स्टेशन असतील.

हे सुद्धा वाचा

दिवाणी न्यायालय सर्वात खोल भूमिगत स्थानक

दिवाणी न्यायालय हे सर्वात खोल भूमिगत स्थानकांपैकी एक आहे. याची रेल्वे पातळी जमिनीच्या खाली सुमारे 28 मीटर आहे. केंद्रीय स्कायलाइट भूमिगत स्टेशनच्या प्लॅटफॉर्म स्तरापर्यंत नैसर्गिक प्रकाश प्रदान करतो. कॉरिडॉर 2चे प्रस्तावित एलिव्हेटेड स्टेशन जमिनीच्या स्तरावर कॉमन इंटरचेंज लॉबीसह भूमिगत स्टेशनवर तिरपे ओलांडते, कॉरिडॉर 1 आणि कॉरिडॉर 2च्या विलीनीकरणाचे चित्रण करते. एलिव्हेटेड स्टेशन रेल्वे पातळी जमिनीपासून सुमारे 14 मीटर उंच आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI