“शिवसेना फोडण्याचं षडयंत्र ‘या’ जिल्ह्यातून झालं”; ठाकरे गटाच्या नेत्यानं नेत्यांची नावं घेऊन सगळं कटकारस्थान सांगितलं

| Updated on: Feb 06, 2023 | 8:29 PM

मागील अडीच वर्षात शिवसेना फोडण्याचं षडयंत्र हे पुणे जिल्ह्यातून झाल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन आहिर यांनी जुन्नर येथील महाप्रबोधन यात्रेत केला आहे.

शिवसेना फोडण्याचं षडयंत्र या जिल्ह्यातून झालं; ठाकरे गटाच्या नेत्यानं नेत्यांची नावं घेऊन सगळं कटकारस्थान सांगितलं
Follow us on

जुन्नर/पुणेः मागील अडीच वर्षात शिवसेना फोडण्याचं षडयंत्र हे पुणे जिल्ह्यातून झाल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन आहिर यांनी जुन्नर येथील महाप्रबोधन यात्रेत केला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे षडयंत्रला बळी पडले नाही तर हे षडयंत्र जाणून बुजून केलं असल्याचा गंभीर आरोपही सचिन अहिर यांनी आढळराव-पाटील आणि शिवतारे यांच्यावर केला आहे. सचिन अहिर यांनी या नेत्यांवर जोरदार निशाणा साधल्याने खळबळ माजली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोस्टल रोडला लतादीदींच नाव द्यावे यासाठी अनेकांनी मागणी केली आहे. मात्र यामध्ये काहीच गैर नाही यापूर्वीही अनेक नावे चर्चेत आली होती.


त्यामध्ये बाळासाहेबांचे नाव द्यावं अशीही कार्यकर्त्यांची भूमिका होती मात्र याचा अधिकार हा राज्यशासनाचा असल्याने यामध्ये बोलण उचित नाही असे शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी आपली भावना व्यक्त केली.

कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत दोन्हींपैकी एका ठिकाणी शिवसेनेला जागा मिळावी अशी आमची सर्वांची आग्रही मागणी होती मात्र शेवटी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम केलं जाईल, यासाठी बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक वेळा विधानसभेला मदत मागितली जाते मात्र महानगरपालिकेला वेगळा न्याय या दोन्ही पक्षांकडून मिळत असल्याची खंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हीच भूमिका भाजपाकडून पाहायला मिळत होती मात्र कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आणि त्यांना विचारत घेऊनच प्रचाराची रणनीती तयार केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीबाबत मागण्या सर्व बाजूने वाढल्या असल्या तरी आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही. त्यामुळे अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतली,

मात्र सगळे एकत्र दिसतील असंही त्यांना यावेळी सांगितले. मात्र एक सीट तरी लढविली पाहिजे अशी भावना व्यक्त करत आघाडीचा जो निर्णय होईल तो मान्य करून कार्यकर्ते कामाला लावू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत जे नेते शिवसेनेवर टीका करत असतील. जे नेते शिवसेनेकडे हात करतील त्यांचे हात कलम केले जातील असा घणाघातही यावेळी करण्यात आला.

शिवाजीराव आढळराव पाटील आणि विजय शिवतारे यांच्यावरही ठाकरे गटाने निशाणा साधत यांच्यावर शिवसेना फोडीचा आरोपही करण्यात आला आहे.