AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणीनंतर मुलींसाठी सरकारची मोठी घोषणा, 14 वर्षांपर्यंत मुलींना मोफत मिळणार ही गोष्ट

Free Cancer Vaccine: लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे समोर आले आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यातील चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणीनंतर मुलींसाठी सरकारची मोठी घोषणा, 14 वर्षांपर्यंत मुलींना मोफत मिळणार ही गोष्ट
14 वर्षांपर्यंतच्या मुलींना कर्करोगाची मोफत लसImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 03, 2025 | 1:53 PM
Share

Free Cancer Vaccine: राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. या योजनेत पात्र महिलांना 1500 रुपये महिन्याला दिले जात आहे. आता ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. फडणवीस सरकारने मुलींसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाला रोखण्यासाठी 0 ते 14 वर्षे वयोगातील मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणाले आरोग्य मंत्री?

पुण्यात बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोग होणारे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे समोर आले आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्यातील चौदा वर्षांपर्यंतच्या मुलींना एचपीव्हीची लस मोफत देण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागासह सर्व विभागांची मंजुरी घेऊन लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. एचपीव्ही लस मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) पासून संरक्षण करते. ज्या विषाणूपासून विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.

महात्मा फुले योजनेचे पैसे रुग्णालयांना मिळाले नाही, त्यावर बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, पुढच्या 8 दिवसांत महात्मा फुले आरोग्य योजनेतील पैसे सर्व रुग्णालयांना दिल्या जातील. अर्थ विभागाच्या काही तांत्रीक अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाबद्दल दोन प्रकारचे मतमतांतर आहेत. या प्रकरणात शेतकऱ्यांचा असणारा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला आहे, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

‘बर्ड फ्लू’ विषयी काय म्हणाले?

विदर्भातील कावळ्यांना ‘बर्ड फ्लू’ ची लागन झाल्याचे समोर आले. त्यावर बोलताना आबिटकर म्हणाले की, बर्ड फ्लूचा प्रकार समोर आल्यानंतर त्याची गांभीर नोंद आम्ही घेतली आहे. बर्ड फ्लूची लागन कोणत्याही व्यक्तीलाही झालेली नाही. शासनाने खबरदारीचे उपाय सुरु केले आहे. चिकन शॉप्स बंद केले आहेत, असे प्रकाश आबिटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस