दोन वर्षांनंतर वाजत-गाजत बाप्पा आला अन् पुणेकरांनी रेकॉर्डच मोडला? वाचा सविस्तर….

पुण्यातील यंदाची मिरवणूक रेकॉर्ड ब्रेक करणार? वाचा...

दोन वर्षांनंतर वाजत-गाजत बाप्पा आला अन् पुणेकरांनी रेकॉर्डच मोडला? वाचा सविस्तर....
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 4:39 PM

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही सगळ्या राज्याचा आकर्षणाचा विषय ठरते. राज्यासह देशभरातून तसेच विदेशातून देखील अनेक पर्यटक पुण्याची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी येतात. विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganapati Visarjan 2022) सादर केले जाणारे आकर्षक देखावे, पारंपरिक वाद्यांच वादन त्यासह पुण्याची विसर्जन मिरवणूक (Pune Ganapati Visarjan Mirvnuk) आणखीन एका कारणासाठी चर्चेत असते ती म्हणजे विसर्जन मिरवणुकिसाठी लागणाऱ्या वेळेमुळे.विसर्जन मिरवणूक किती वेळेत संपवायची, याचे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे यंदाची मिरवणूक कमी वेळेत संपणार की लांबणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये सर्वांत कमी वेळेत विसर्जन मिरवणूक पार पडली. मात्र, यंदा रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होईल आणि आतापर्यंतच्या वेळेचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील, असेही बोलले जाऊ लागले आहे. त्याच कारण देखील तस आहे कारण काल सकाळी 10.30 च्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक अद्याप देखील संपलेली नाही.

साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या विसर्जन मिरवणुका यंदा दोन वर्षांच्या करोनामुक्तीमुळे धुमधडाक्यात होत आहेत. त्यातच राज्य सरकारने यावेळी कुठलेही नियम व अटी न घालता सण साजरा करू द्या असे आदेशच प्रशासनाला दिले होते. त्यामुळे गणेशभक्तांचा आनंद द्विगणीत असल्याचे पाहिला मिळत आहे. आणि म्हणून आता पुण्याची गणपती विसर्जन मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

काल 10.30 च्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक आता 30 तास उलटून गेले तरी सुरुच आहे. त्यात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावर्षी निर्बंध मुक्त मिरवणूक होत आहेत त्यामूळे वेळ लागत आहे त्यासोबतच यावेळी प्रत्येक मंडळाला ढोल ताशांची संख्या अधिक असल्याने देखील हा वेळ वाढत जात आहे अशी माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

 मिरवणुकीचा इतिहास

खरतर पुण्याची मिरवणूक ही खूप वेळ चालते यात शंका नाही. त्यातच जुनी माणसं सांगतात की 1966 सालची मिरवणूक ही सगळ्यात जास्त म्हणजे 38 तास चालू होती असे सांगतात. अर्थात यात देखील अनेक मतभेद आहेत.

पुण्यात गेल्या आठ वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

2014- 29 तास 12 मिनिटे

2015- 28 तास 38 मिनिटे

2016- 28 तास 30 मिनिटे

2017- 28 तास 05 मिनिटे

2018- 26 तास 36 मिनिटे

2019-24 तास

2020 आणि 2021 कोरोना

2022 30 तास झाले तरी अद्याप मिरवणूक सुरुच आहे.

पुण्यातील मानाचे गणपती आणि यावर्षी लागलेला वेळ

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी 10.30 ला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 8.30 वाजता मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच विसर्जन झालं. म्हणजे केवळ मानाच्या गणपतींना 10 तास लागले तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच विसर्जन आज सकाळी 11 वाजून 21 मिनिटांनी पार पडलं.

काल विसर्जन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2839 पेक्षा अधिक मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन झालं.

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

पुण्याची विसर्जन मिरवणूक ही मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होते. प्रथम मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत पुढे असतात. मंडई, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने, अलका टॉकीज चौकात येते. त्यासोबतच कुमठेकर रस्ता, टिळक रोड आणि शास्त्री रोड या रोडवरून देखील मिरवणुका अलका टॉकीज चौकात येत असतात.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.