AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | कदाचित भाजपच ‘ईडी’ चालवत असेल; भाजपच्या नेत्यांची नावे घेतल्याने नबाव मालिकांना ईडीची नोटीस – सुप्रिया सुळे

नवाब भाईकडे ईडीची नोटीस आली आहे. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट करत असतात. असे म्हणण्यापेक्षा ट्विट करत याला अटक करणार आहेत , त्याला अटक करणार आहेत अशी धमकी देतात. गेले अनेक दिवस , अनेक महिने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना ईडीची नोटीस आलेल्या आहेत.

Supriya Sule | कदाचित भाजपच 'ईडी' चालवत असेल; भाजपच्या नेत्यांची नावे घेतल्याने नबाव मालिकांना ईडीची नोटीस - सुप्रिया सुळे
Supriya Sule
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 11:14 AM
Share

पुणे – समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी(Nawab Malik) अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली.  यामुळेही त्यांना ईडीची (ED) नोटीस आली ही शक्यता नाकारता येत नाही. नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. त्यामुळेही झालं असेल. कारण सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याच आश्चर्य वाटत नाहीत. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. भाजपचे आणि ईडीचे अध्यक्ष एक असतील. किंवा भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल. असे असू शकते. माझा ईडीचा काही अभ्यास नाही.  जाणीवपूर्वक  ठरवून या गोष्टी केल्या जात असल्याचे मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं. ट्विटर या माध्यमाचा खूप चांगला उपयोग भाजपचे लोकं या धमक्यांसाठी करत आहेत. हे निदर्शनास आले आहे.अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya  Sule) यांनी केली आहे.

मला कोणत्याही प्रकारची चिंता  वाटत नाही  नावाब मलिक महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरे त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस आली होती का? तर माझ्या माहितीप्रमाणे नाही . माझा स्वतःचा नवाबांशी बोलणं झालेलं नाही. पण मला जी माहिती मिळतेय त्यांनुसार त्यांच्या घरी जाऊन हे पथक धडकले. नावाब यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकाला पूर्ण माहिती देत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची चिंताही वाटत नाही .

ट्विटचा वापर धमक्यांसाठी केला जातोय

‘अन आश्चर्यही वाटत नाही , की नवाब भाईकडे ईडीची नोटीस आली आहे. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट करत असतात. असे म्हणण्यापेक्षा ट्विट करत याला अटक करणार आहेत , त्याला अटक करणार आहेत अशी धमकी देतात. गेले अनेक दिवस , अनेक महिने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना ईडीची नोटीस आलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोललं जात आहे , त्या त्या ठिकाणी चौकशी, ईडीच्या नोटीस आल्या आहेत. याबाबत मी स्वतः संसदेत बोललं होते.

बीडमध्ये तरुणाचा कौतुकास्पद निर्णय, तृतीय पंथीय मुलीशी विवाह करणार, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लग्नसोहळा!

यंत्रणेचा गैरवापर सुरु, नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्यानं ED ची कारवाई

नाबार्डचा पतपुरवठा : ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटींची तरतूद, काय आहेत धोरणे?

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.