संपवतोच तुला… मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, कुटुंबासमोरच घडला प्रकार; पुणे हादरले

याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संपवतोच तुला... मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, कुटुंबासमोरच घडला प्रकार; पुणे हादरले
sameer thigaleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 8:18 AM

पुणे: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. गुंडांनी गोळ्या झाडल्या ठेवा थिगळे यांचे कुटुंबीय ही गटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर या गुंडांनी फारिंग केली. खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणीची मागणी करत हा गोळीबार केला.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीय हादरले

यावेळी या गुंडांनी समीर थिगळे यांच्या छातीवर गोळी झाडली. पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या गुंडांना हवेत गोळीबार करून थिगळे यांना धमकावून घटनास्थळावरून पळ काढला. थिगळे यांच्या कुटुंबीयांसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे थिगळे कुटुंबीय हादरून गेले आहेत. या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

खंडणीही मागितली

याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरू नगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.

जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

दरम्यान, समीर थिगळे हे मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. गेल्यावर्षीच एप्रिलमध्ये त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं होतं. त्यांच्यावर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.