MNS Vasant More : ‘लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर आजही ठाम, राज ठाकरे माझ्या मनात; पक्ष सोडणार नाही’

लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. मी माझी भूमिका आणि अडचण राज ठाकरेंना (Raj Thackeray) समजावून सांगेन. मला राज ठाकरेंवर विश्वास नाही तर खात्री आहे, की ते आमची अडचण समजून घेतील, असे वक्तव्य मनसे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केले आहे.

MNS Vasant More : लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर आजही ठाम, राज ठाकरे माझ्या मनात; पक्ष सोडणार नाही
वसंत मोरे, नेते, मनसे
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 9:29 AM

पुणे : लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. मी माझी भूमिका आणि अडचण राज ठाकरेंना (Raj Thackeray) समजावून सांगेन. मला राज ठाकरेंवर विश्वास नाही तर खात्री आहे, की ते आमची अडचण समजून घेतील, असे वक्तव्य मनसे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केले आहे. पक्षातील काही पार्ट टाइम पदाधिकारी तक्रार करत आहेत. याबाबत राज ठाकरेंकडे मी तक्रार करणार आहे. मी मनसेत आहे आणि मनसेतच राहणार, असे ठामपणे ते म्हणाले आहेत. राज ठाकरे माझ्या मनात आहेत. आज भेटून मी माझी भूमिका मांडणार आहे. वसंत मोरे पक्ष सोडणार नाही. आज भेट घेत आहे. राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात बघू, असेही वसंत मोरे म्हणाले.

‘मनसे सोडायची इच्छा नाही’

वसंत मोरे यांच्या पक्षात येण्याने पालिका निवडणुकीत ताकद वाढणार आहे. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना आपल्या पक्षात खेचण्यास जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली नुकतीच दिली होती.

मोरेंची ठाम भूमिका

राज ठाकरे यांनी ज्यावेळेपासून मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केले आहे, त्यावेळेपासूनच वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले. त्यांना त्या पदावरून हटवले गेले असल्यामुळे भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला बसणार याचे उत्तर आता येणारा काळच देणार आहे.

आणखी वाचा :

Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

Pune : भावना दुखावण्याचं कारण पुढे करत पोलिसांनी रद्द केला पुण्यात होणारा नास्तिक मेळावा

Baramati Ajit Pawar : ‘…नाहीतर कुणाला तरी काठीनं बदडून काढाल’ ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी