‘ज्ञानवापी’चं लोण आता सांस्कृतिक राजधानी पुण्यात! 2 मंदिरांच्या जागी मशिद उभारल्याचा दावा, मनसे लढा उभारणार

'ज्ञानवापी'चं लोण आता सांस्कृतिक राजधानी पुण्यात! 2 मंदिरांच्या जागी मशिद उभारल्याचा दावा, मनसे लढा उभारणार
ज्ञानवापी मशीद (फाईल फोटो)
Image Credit source: tv9

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्याविरोधात मनसेकडून लढा उभारण्यात येईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.

योगेश बोरसे

| Edited By: सागर जोशी

May 22, 2022 | 6:25 PM

पुणे : राज आणि देशात सध्या मशिदींवरील भोंगे आणि मशिदींच्या उभारणीवरुन वाद सुरु आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन उभारण्यात आलं. तर तिकडे उत्तर प्रदेशात ज्ञानवापी मशिद (Gyanvapi Mosque) परिसरात केलेल्या सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आलाय. तर शिवलिंग सापडल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हा मुद्दा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आहे. अशावेळी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही (Pune) दोन मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्याविरोधात मनसेकडून लढा उभारण्यात येईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.

मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातही मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्या आहेत.  पुण्यातील कसबा पेठ परिसरात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या आहेत. काशीतील ज्ञानवापी मशिदीप्रमाणे या मंदिरांच्या जागेवर छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले. त्याबाबत अजय शिंदे यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला आहे. तसंच मनसे मंदिरांसाठी लढा उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे काशीतील ज्ञानवापीचं लोण आता पुण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ज्ञानवापीवरुन गुप्तचर विभागाचा सरकारला इशारा

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरुन हिंदू आणि मुस्लीम हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढावा, अशी सूचना गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन देशात मोठे आंदोलन होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. हिंदू, मुस्लीम तेढीचा फायदा घेऊन काही परकीय शक्तीही यात कार्यरत होऊ शकतात. त्यामुळे देशातील सलोखा कायम ठेवायचा असेल, तर तातडीने ज्ञानवापी मशिदीच्या मुद्य़ावर तोडगा काढण्याची सूचना गुप्तचर विभागाने केली आहे.

ज्ञानवापीबाबत हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांचा दावा काय?

हिंदू पक्षकार

काशी विश्वनाथ धाम ज्ञानवापी परिसर स्थित गौरी स्वयंभू आदि विश्वेश्वरनाथच्या मंदिरांपैकी एक आहे. इथे पूजेसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी हिंदू पक्षकारांची मागणी आहे. या परिसरातील सर्व विग्रहांची वसुस्थिती माहित करुन घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. 1991 साला पूर्वी 18 विग्रहांत नियमित दर्शन, पूजाविधी करण्यात येत होते. आदि विश्वेशर परिसरातील विग्रहांची परिस्थिती आहे तशी राहू द्यावी.

मुस्लिम पक्षकार

तर मशीद कमिटीच्या याचिकेत वाराणसीत असलेल्या ज्ञानवापी शृंगार गौर परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मशीद प्राचीन काळापासून आहे आणि वाराणसी कोर्टाने दिलेला सर्वेचा आदेश हा पूजास्थळाच्या नियमांच्या विपरीत आहे. 15 ऑगस्ट 1947 च्या पूर्वी असलेले कोणतेही प्रार्थनास्थळ, दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात बदलता येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशी ते ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत ते राहायला हवे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें