AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, ‘या’ वाहनांना असणार वाहतूक बंदी

आजपासून पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, 'या' वाहनांना असणार वाहतूक बंदी
| Updated on: Aug 17, 2024 | 12:57 PM
Share

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आला आहे. आता आजपासून पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा आजपासून शुभारंभ होत आहे. आज शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रिडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होत असल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

स्वारगेट चौकात मोठी बॅनरबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या बॅनरवर वचनपूर्ती सोहळा असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री अदिती तटकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट चौकात देखील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्याची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?

पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग या सर्व महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. हे निर्बंध कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहने, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू असणार नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबद्दलचे अध्यादेश काढले आहे.

महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे सध्या महिलांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लाडक्या बहिणींनी शिंदेंना पाठवल्या राख्या

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर सोलापुरातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या पाठवल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्यानंतर महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या आहेत. तर लहान विद्यार्थिनी आणि महिलांनी फुगडी खेळत केला जल्लोष साजरा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा शब्द पाळत लाभ दिल्याने सर्व महिलांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.