AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरेंनी कुख्यात गुंड गजा मारणेची वाढदिवसाला घेतली भेट, व्हिडीओ तुफान व्हायरल

NCP Rupali Thombare video Gajanan Marne : पुण्यातील कुख्यात गुंज गजानान मारणे चर्चेत येताना दिसत आहे. राजकीय पुढारी त्याच्या भेटीगाठी घेत आहेत. अशातच परत एकदा तो चर्चेत आला आहे तो म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी जाहीरपणे त्याला शुभेच्छा दिल्यात.

राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरेंनी कुख्यात गुंड गजा मारणेची वाढदिवसाला घेतली भेट, व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Jun 27, 2024 | 7:56 PM
Share

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे पुन्हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीच नेते मंडळी त्याच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनीही मागे मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि नवनिर्वाचित खासदारा निलेश लंके यांनीही भेट घेतलेली. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गजानन मारणेसोबत व्हिडीओ टाकत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या व्हिडीओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

पार्थ पवार यांनी गजानन मारणेची भेट घेतल्यावर अजित पवार यांनी आपण त्याला विचारणा करणार असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाहीतर पुन्हा असे अजिबात घडता कामा नये, असं म्हणत अजित पवारांनी मुलाला फटकारलं होतं. मात्र आता त्यांच्याच महिला नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी गजानन मारणेसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रूपाली ठोंबरे गजा मारणेचा सत्कार करत आहेत.

पाहा व्हिडीओ:-

‘गजानन मामा आपणास जन्म दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड गजा मारणेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे अजित पवारांनी आपल्या मुलाल फटकारलं मात्र रूपाली ठोंबरे पाटलांनी जाहीरपणे कुख्यात गुंडाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा  व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रत्येकाला दम भरला होता. मात्र त्यानंतरही  इन्स्टाग्रामवर M Company pune king या नावाने गजा मारणे याचं फॅन पेज आहे. ज्यावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडीओ स्टोरीला ठेवले जातात. त्यासोबतच काही तशा प्रकारचे  व्हिडीओही पोस्ट केलेले आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.