लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर…

NCP Leader Sharad Pawar on Loksabha Election 2024 : लोकसभेचा निकाल हा भाजपसाठी धक्कादायक होता. या निकालावर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. राम मंदिराच्या उभारणीचा दाखला देत शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, राम मंदिर झाल्यानंतर...
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 6:50 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपला धक्का देणारा ठरला. यात भाजपला अपेक्षित यश आलं नाही. तर इंडिया आघाडीने उसंडी मारल्याचं दिसलं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यंदा 300 चा आकडा 240 वर आला. 60 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी वेगळा कौल दिला. मला असं वाटत होतं की, देशात राम मंदिर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार त्यानुसार होईल आणि उत्तर प्रदेशचे जनता मतदान करेल. मंदिराच्या नावावर मतदान मागितलं. म्हणून लोकांनी वेगळा निकाल दिला. मंदिर अयोध्येत बांधलं पण तिथंच भाजपचा उमेदवार पडला. देशाची लोकशाही माणसांच्या शहाणपणामुळे टिकली आहे, असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.

लोकसभेच्या निकालावर भाष्य

लोकसभा निवडणूक आता झाली आहे,आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजे. त्यांनी वेगळा निकाल दिला. देशात देखील वेगळा निकाल आला. गेली 10 वर्ष सत्ता मोदी साहेबांकडे आहे आणि त्याचा परिणाम या निकालात दिसला. वेगळा निकाल लागला. सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं आता अशी अपेक्षा करू की देशात आता स्थिरता येईल, त्याची देशाला गरज आहे. निवडणूक येयील आणि जातील देश आर्थिक मजबूत झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.

दुष्काळी दौऱ्याची घोषणा

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून बारामतीमध्ये आहे आणि या तीन दिवसांत मी अनेक ठिकाणी जाणार आहे. त्याचा उद्देश आहे की दुष्काळी दौरा आहे माझा एक अनुभव आहे. मी ज्यावेळी दुष्काळी दौऱ्याला निघतो. त्यावेळी पाऊस सुरू होतो आणि आजही पाऊस झाला, असं म्हणत शरद पवार यांनी दुष्काळी दौऱ्याची घोषणा केली आहे.

यंदा राज्यात आणि देशात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात साखरेच उत्पन्न दोन नंबरला राहतं. पण यंदा आपलं राज्य एक नंबरला गेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखरेच उत्पन्न कमी झालं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.