‘हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही’, शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर घणाघात

"माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे", असा घणाघात शरद पवार यांनी केला.

'हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही', शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
शरद पवार आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:15 PM

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. “राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबतीत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे”, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

“मोदींनी शिवसेनाबाबत उल्लेख केला की, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणासाचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की, त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफान आणि अस्वस्थ कसा होतो त्याप्रकारची स्थिती झाली”, अशी टीका शरद पवारांनी केली.

‘संघटना मजबूत करावी लागेल’

“ठिक आहे. त्यांच्याकडून ते झालं. आपण विसरुया. आपण नव्या विचाराने जाऊया. आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार करुया. ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावी लागेल. संघटना मजबूत करावी लागेल. समाजातील दलित वर्ग आहे, अल्पसंख्याकांचा वर्ग आहे, महिला वर्ग आहे, त्यांच्या हिताची जतन करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. हे करण्याचा पक्ष कुठला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हा इतिहास निर्माण करायचा आहे”, असं शरद पवार म्हणाले.

‘अयोध्येकरांनी मोदींच्या उमेदवाराचा शंभर टक्के पराभव केला’

“निवडणुका येतील. त्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ. लोकांना बरोबर घेऊ. त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याचं वचन त्यांना देऊ. त्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशाचे लोक मोदी सारख्यांनी प्रश्न जे काढले त्या प्रश्नांना फारसं लोक महत्त्व देत नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा लोकांची चर्चा होती की, राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं. आनंद आहे. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईल. त्या ठिकाणी रामांचा सन्मान ठेवेन. पण राजकारणासाठी मी कधी त्याचा वापर करणार नाही. ते चुकीचं काम मोदींनी केलं. त्याची नोंदी अयोध्येच्या जनतेने केले. राम मंदिर असलेल्या अयोध्येत मोदींच्या उमेदवाराचं शंभर टक्के पराभव अयोध्येच्या जनतेने केला. हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्यावर फारसा विचार करायचा नाही”, असं आवाहन मोदींनी केलं.

‘6 वर्षे काम केलं, एकही सुट्टी नाही’

“तुम्ही चांगली लोकं निवडून दिले. यातील प्रत्येक व्यक्ती लोकांच्या सुख-दु:खासाठी काम करणार आहेत. मी तुम्हाला खात्री देतो, आमचे सगळे खासदार दिल्लीत जातील, तुमच्या प्रश्नांसाठी सतत जागृत राहतील. नवीन काही लोकं आहेत. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल ते दिलं जाईल. मलाही यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथे जाऊन 56 वर्ष पूर्ण होत आहेत. आणखी किती वर्षे? एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर सोपवलं. त्यामुळे मला याबाबतचं जे ज्ञान असेल ते या आठही जणांच्या पाठिमागे कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करु”, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

‘8 खासदार हे महाराष्ट्राच्या जनतेचं अष्टप्रधान मंडळ’

“सुदैवाने सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत. सुप्रिया यांची चौथी टर्म आहे, कोल्हे यांची दुसरी टर्म आहे. संसदपटू म्हणून सन्मान या दोघांना मिळाला आहे. या दोघांच्या अनुभवाची मदत सर्वांना होईल. त्यांच्या मार्फत तुमच्या जिल्ह्याचे, मतदारसंघाचे आणि तुमच्या राज्याचे प्रश्न सोडवले जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ जसं बनलं होतं तसं महाराष्ट्राच्या जनतेचं अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील याची खात्री मी देतो”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.