AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसब्यात आता नवा वाद, अभिजीत बिचुकले यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार?

कसबा पोटनिवडणुकीत सातारच्या अभिजीत बिचुकलेंचा उमदेवारी अर्ज चर्चेत आहे. काल अर्ज भरताना काही पत्रकारांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर बिचुकलेंवर अॅट्रॉसिटी लावण्याची मागणी काही जणांकडून केली जातेय.

कसब्यात आता नवा वाद, अभिजीत बिचुकले यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 09, 2023 | 12:06 AM
Share

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by election) आधीच अनेक स्थानिक वाद असताना त्यात अभिजीत बिचुकलेंची (Abhijit Bichukale) भर पडलीय. अभिजीत बिचुकलेंवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार लहुजी छावा संघटनेनं दिलीय. आणि दुसरीकडे पुण्यातल्या पुढाऱ्यांनी षडयंत्र रचल्यामुळे बिचुकले पोलीस संरक्षणाची मागणी करतायत. नेमका वाद सुरु झाला बिचुकलेंचा अर्ज भरण्यापासून. काल कुटुंबासह अभिजीत बिचुकले अर्ज भरण्यासाठी पोहोचले. कसब्यातून उमेदवारी भरत असल्यामुळे कसबा मतदारसंघाचे प्रश्न काय? कसबा मतदारसंघ नेमका कसा आहे? असे काही प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर बिचुकलेंचा पारा चढला.

याचदरम्यान एका पत्रकाराच्या प्रश्नावरुन बिचुकलेंची बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढला. आणि तेच प्रकरण आता तापू लागलंय.

आतापर्यंत अभिजीत बिचुकलेंनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीपासून ते पदवीधर आमदारापर्यंतच्या निवडणुकीत एकूण ८ ते ९ वेळा अर्ज केले आहेत.

2004 बिचुकलेंनी सातारा विधानसभची निवडणूक लढवली. 2009 पुन्हा सातारा विधानसभा 2014 उदयनराजेंविरोधात सातारा लोकसभेतून बिचुकले उमेदवार होते 2014 सांगली लोकसभेतूनही बिचुकलेंनी अर्ज भरला 2019 वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली 2020 मध्ये पदवीधर निवडणुकीत अर्ज भरला. मात्र उमेदवार होऊ इच्छिणाऱ्या बिचुकलेंचं नाव मतदान यादीतून गायब होतं 2021 मध्ये पंढरपूर पोटनिवडणूक 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर पटोनिवडणुकीसाठी तयारी केली

त्यानंतर 2022 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी बिचुकलेंनी अर्ज करण्याची तयारी केली होती. मात्र अर्जासाठी किमान 9 खासदारांचा पाठिंबा लागतो. म्हणून जर त्यावेळी शरद पवारांनी पाठिंबा दिला असता, तर कदाचित चित्र वेगळं असतं, असं बिचुकले म्हणाले होते.

अभिजीत बिचुकलेंचा कॉन्फिडन्स भल्या-भल्यांना घाम फोडतो. कधी बिचुकले सलमान-शाहरुखशी पंगा घेतात. कधी नायक सिनेमातला एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा वर्तवतात. त्यांच्या दाव्यानुसार 2019 ला बिचुकलेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार होते, मात्र तेव्हा संधी हुकल्यामुळे 2024 साठी त्यांनी तयारी सुरु केलीय.

याआधीच्या निवडणुकांवेळी बिचुकलेंची चर्चा अर्ज भरताना असायची. मात्र कसबा ही पहिली निवडणूक जिथं अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशीही बिचुकले चर्चेत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?