भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार : नितीन राऊत

| Updated on: Jan 01, 2021 | 11:02 PM

महाविकास आघाडी सरकार भीमा-कोरेगावातील विजयस्तंभ या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल, असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं (Nitin Raut on Bhima Koregaon development)

भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार : नितीन राऊत
नितीन राऊत
Follow us on

पुणे :महाविकास आघाडी सरकार भीमा-कोरेगावातील विजयस्तंभ या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी, राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी, यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे,” असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भीमा कोरेगाव येथे दिले (Nitin Raut on Bhima Koregaon development).

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (1 जानेवारी) शुक्रवारी सकाळी 6 वाजता भीमा कोरेगाव येथील ‘विजय स्तंभाला’ मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बु., तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. ‘विजय स्तंभाला’ अभिवादन करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. नियोजित वेळेनुसार ठीक 6 वाजता त्यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना दिली. याप्रसंगी त्यांना नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

“भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेले दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला त्या मागील समाजकारणांना साजेसे दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे,” असं मत त्यांनी मांडलं (Nitin Raut on Bhima Koregaon development).

हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना

सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाडांच्या निवासस्थानी सकाळी 7 च्या सुमारास भेटीला जात असताना नितीन राऊत यांना लाईट असूनही पुरेसा प्रकाश जाणवला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी संभाजी महाराज समाधी आणि गायकवाड समाधी परिसरात रात्रीही प्रकाशाने उजळून निघावा म्हणून तात्काळ हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना केल्या.