शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम

| Updated on: Jun 14, 2021 | 2:49 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शाळांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे.

शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय (No clear instruction about how to start schools from 15 June in Maharashtra).

सुधारित परिपत्रकामुळे शाळा कधी सुरु करायच्या याची स्पष्टता झाली आलीय. या परिपत्रकानुसार 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश सरकारने शाळांना दिलेत. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम आहे.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, “शाळा प्राशासन अद्याप मार्गदर्शक सुचनांच्या प्रतिक्षेत‘‘शाळा नेमक्या कधी सुरू करायचा, याबाबत संभ्रम होता. पण आता त्याची स्पष्टता झाली. शाळा 15 जूनपासून सुरू होतील. परंतु शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या आहेत, याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.”

“दरवर्षी या परिपत्रकात प्रथम सत्र, द्वितीय सत्र, दिवाळी सुटीचा कालावधी असा तपशीलवार उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शाळांना वर्षभरातील सुट्ट्यांचे, परिक्षांचे आणि इतर कामकाजाचे नियोजन करता येत नाही”, असं मत हरिश्चंद्र गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :

शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांमध्ये संघर्ष का होतोय? राज्य शासनाची भूमिका काय?

PHOTOS : ‘या’ आहेत जगातील 5 आगळ्यावेगळ्या शाळा, इथली शिकवण्याची पद्धत पाहून अवाक व्हाल

PHOTOS : ‘या’ देशात पुरुष शिक्षकांनी शाळेत स्कर्ट का घातले? फोटो पाहून संपूर्ण प्रकरण समजेल

व्हिडीओ पाहा :

No clear instruction about how to start schools from 15 June in Maharashtra