Pune crime : आणखी एक संतापजनक घटना! वर्ग शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, गुन्हा दाखल

या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये संबंधित मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर या घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune crime : आणखी एक संतापजनक घटना! वर्ग शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, गुन्हा दाखल
मंचर पोलीस स्टेशनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 10:46 AM

आंबेगाव, पुणे : वर्ग शिक्षकानेच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ (Physical abuse) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजी उमाजी घोडे असे विनयभंग केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आज (30 ऑगस्ट) पहाटे पाच वाजता पारगाव पोलीस स्टेशनमध्ये लाखनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील (ZP school) शिक्षक बाबाजी उमाजी घोडे पारगावचे केंद्रप्रमुख फिर्यादी कांताराम गोंडवे यांनी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार 354 त्याचप्रमाणे पोक्सो कलम 8 आणि 12 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, भिगवण येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यानंतर तेथील प्रशासनाने काही उपाययोजना केल्या.

ग्रामस्थांसह पालकांनी केली मुख्याध्यापकांकडे तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला. आपल्यासोबत संबंधित शिक्षक गैरप्रकार करत असल्याचे मुलीने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर सर्वत्र ही घटना पसरल्यानंतर मुलीचे पालक आणि ग्रामस्थ मुख्याध्यापकांना भेटले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही माहिती केंद्रप्रमुख तसेच गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली.

गुन्हा दाखल

या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये संबंधित मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर या घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पुणे ग्रामीणचे एसपी अभिनव देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खाटे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

भिगवण येथेही घडला होता प्रकार

भिगवणच्या जिल्हा परिषद शाळेतही मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. यानंतर तेथील प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर्शनी भागात हेल्पलाइन नंबर लावणे, तक्रार पेटी ठेवणे अशा उपाययोजना करण्याचे प्रशासनाने ठरवले. विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.