AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Crime : शिक्षकी पेशाला काळीमा! विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या झेडपी शाळेच्या शिक्षकाविरोधात 2 गंभीर गुन्हे

Bhandara ZP teacher : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील शिक्षक जगदीश पठाडे यांच्यावर सनसनाटी आरोप करण्यात आले होते. पठाडे यांनी यांनी विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला होता.

Buldana Crime : शिक्षकी पेशाला काळीमा! विद्यार्थीनीवर लैंगिक छळ करणाऱ्या झेडपी शाळेच्या शिक्षकाविरोधात 2 गंभीर गुन्हे
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 10:44 AM
Share

बुलढाणा : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बुलढाणा (Buldana Crime News) जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. एका झेडपी शाळेतील सरांनी विद्यार्थीनीचा लैंगिक छळ (Physical abuse by teacher on school girl) केलाय. ही संतापजनक घटना पीडित विद्यार्थीनीच्या आईने तक्रार दिल्यानंतर समोर आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडालेली होती. त्यानंतर बुलडाण्यात एकच खळबळ उडालेली. अखेर आता या नराधम शिक्षकाविरोधात पोलिसांनी विनयभंगासह दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे (ZP Teacher Booked) नोंदवून घेतले आहेत. पॉक्सोसह एट्रोसिटीचा गुन्हा शिक्षकाविरोधात दाखल करण्यात आला आहे. बुलडाणार्या जिल्ह्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर शिक्षकाला तातडीनं शाळेतून निलंबितही करण्यात आलं होतं. अखेर आता पोलिसांनीही या शिक्षकाविरोधात कारवाई केलीय.

कळलं कसं?

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील शिक्षक जगदीश पठाडे यांच्यावर सनसनाटी आरोप करण्यात आले होते. पठाडे यांनी यांनी विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलेला होता.

महिन्यापूर्वी हा प्रकार घडलेला. पण शाळेच्या शिक्षकांकडून आणि ग्रामस्थांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस हे प्रकरण सगळ्यांसमोर आलंच. स्थानिक पत्रकारांच्या प्रयत्नामुळे या धक्कादायक प्रकाराची माहिती सगळ्यांसमोर आल्यानंतर खळबळ माजली होती. बुलडाण्याचा शिक्षण विभागही ही घडना समोर आल्यानंतर हादरुन गेला होता.

आईच्या तक्रारीमुळे शिक्षकावर गुन्हा

पीडित विद्यार्थीनीच्या आईने या संपातजनक प्रकाराची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर अमडापूर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाविरोधात विनयभंग, पॉक्सो आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे शिक्षकाचं निलंबन जरी करण्यात आलं असलं तरी आता त्याही पुढे जात मुख्याध्यापकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने झेडपी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रत्नापरखी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संतापजनक प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तसंच ज्यांच्यावर विश्वास ठेवून पालक आपल्या मुलींना शाळेत शिकायला पाठवतात, त्यांच्यावरच संशयाच्या नजरेतून पाहिलं जाऊ लागलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.