AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी 8.15 ची वेळ… स्थळ पिंपरी चिंचवड… गर्ल होस्टेल बाहेर बॉक्स दिसताच खळबळ… पोलिसांचा घेराव, नाकेबंदी, अखेर…

पिंपरी चिंचवड येथील डीवाय पाटील गर्ल्स हॉस्टेलबाहेर सकाळी एका संशयास्पद बॉक्समुळे खळबळ उडाली. बॉम्बच्या भीतीने परिसरात पोलिसांचा घेराव व नाकेबंदी करण्यात आली. पोलिसांनी बॉक्स उघडल्यावर त्यात टेडी बेअर आढळला, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा टेडी बेअर एका विद्यार्थिनीच्या प्रियकराने भेट म्हणून पाठवला होता.

सकाळी 8.15 ची वेळ... स्थळ पिंपरी चिंचवड... गर्ल होस्टेल बाहेर बॉक्स दिसताच खळबळ... पोलिसांचा घेराव, नाकेबंदी, अखेर...
गर्ल होस्टेल बाहेर बॉक्समुळे खळबळ
| Updated on: May 16, 2026 | 2:26 PM
Share

पिंपरी चिंचवडकरांसाठी आजचा दिवस धाकधुकीचा ठरला. पिंपरी चिंचवडच्या एका गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर एक बॉक्स दिसल्याने चांगलीच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने हा बॉक्स ठेवला. अचानक दिसलेल्या या वस्तूमुळे सर्वांचेच धाबे दणाणले. यात बॉम्ब तर नाही ना? अशी भीती निर्माण झाली. त्यानंतर लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही या संपूर्ण परिसराचा ताबा घेत नाकेबंदी केली. त्यानंतर पोलिसांनी हा बॉक्स मोठ्या शिताफिने उघडाल, तोच त्यात…

पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमधील डीवाय पाटील विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलवर आलेल्या एका गिफ्ट पॅकेजमुळे मोठी खळबळ उडाली. डीवाय पाटील राजे राजेश्वरी गर्ल्स हॉस्टेलच्या गेटवर सकाळी 8.15 च्या सुमाराला एक भला मोठा गिफ्टचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्या बॉक्सचा संशय आल्याने सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे विद्यापीठाच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांमध्येही मोठी खळबळ उडाली. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे निनावी फोन येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झाले होते. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीने केवळ पैसे वसूल करण्यासाठी हा प्रकार केला होता. त्याच्याकडे रुग्णालयात जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने हा प्रकार केल्याचं उघड झाले होते.

अन् सर्वांनीच…

दरम्यान, आज गर्ल्स होस्टेलच्या बाहेर अचानक मोठा बॉक्स दिसल्याने पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली. संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. कुणालाही परिसरात सोडण्यात येत नव्हते. मुलींनाही बॉक्सच्या आसपास जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वत: हा बॉक्स उघडला. त्यात एक टेडी बियर ठेवलेला आढळला. त्यामुळे पोलीस अधिक सतर्क झाले. टेडी बियरमध्ये तर बॉम्ब नाही ना? असं प्रत्येकाच्या मनात आलं. त्यानंतर टेडी बियरची तपासणी करण्यात आली तर त्यात असं काही नव्हतं. बॉक्समध्ये केवळ टेडी बियर होता. बॉम्ब नव्हता हे स्पष्ट झालं. त्यामुळे पोलीस, वसतिगृहातील मुली आणि विद्यापीठ प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

पोलिसांनी पोलिसांनी बॉक्सची तपासणी करत बॉक्स उघडल्यानंतर त्यामध्ये टेडी बियर असल्याचं स्पष्ट झालं. पण पुण्यात नुकत्याच घडलेल्या बॉम्ब ठेवण्याच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर बॉक्समुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या बॉक्समध्ये कोणतीही धोकादायक वस्तू नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली.

तो कोण ?

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर होस्टेलवरच्या एका मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने हा टेडी बियर गिफ्ट पाठवला असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, मैत्रीणीसाठी टेडी बियर ठेवणारा व्यक्ती कोण? आणि होस्टेलमधील ती मुलगी कोण? याचा शोध अजून लागलेला नाही. पोलीस याचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...