Bullet : फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडणाऱ्यांनो, सावधान! पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कचाट्यात सापडलात तर…

| Updated on: Jul 01, 2022 | 5:12 PM

फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात.

Bullet : फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडणाऱ्यांनो, सावधान! पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कचाट्यात सापडलात तर...
बुलेटला आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कारवाई
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : बुलेट (Bullet) चालकांनो सायलेन्सरमधून कर्कश्य आवाज काढून रस्त्यावर जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा… बुलेटचा फाडफाड आवाज काढून फिरणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस कारवाई करत आहेत. अगोदर केवळ बुलेटचा सायलेन्सर काढून घेतला जात होता. आता मात्र थेट ध्वनी प्रदूषण (Sound Pollution) होत असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत 22 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्यादेखील ही कारवाई जोरात सुरू असून स्वतः पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Anand Bhoite) यांनी लक्ष घातले आहे. मागील काही दिवसांपासून बुलेट या दुचाकीचे सायलेन्सर बदलून वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. एक फॅशन म्हणून दुचाकीचालक याकडे पाहतात, असे आनंद भोईटे यावेळी म्हणाले.

‘…तरीही काही वाहनचालकांमध्ये सुधारणा नाही’

फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात. त्यादृष्टीने मागील काही दिवसांपासून जवळपास 2200 बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 22 लाख दंड वसूल केला. मात्र तरीदेखील काही वाहनचालकांमध्ये अद्याप सुधारणा नाही झालेली. असे भोईटे यांनी सांगितले.

वाहन जप्तीचीही कारवाई

दुसऱ्यांदा ज्यांच्यावर कारवाई होत आहे, त्यांच्यावर 279, 290 (सार्वजनिक उपद्रव) आणि वाहनांमध्ये मॉडिफिकेशन या कलमांखाली गुन्हे दाखल करत आहोत. वाहनदेखील जप्त करण्याची प्रक्रिया केली जात आहे. न्यायालयाकडून मान्यता घेऊन ते वाहन त्याला परत मिळणार आहे. मात्र या सर्वांमध्ये वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अशाप्रकारे सायलेन्सर बदलू नये, ध्वनीप्रदुषण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रकार वाढले

मूळ बुलेटचे सायलेन्सर बदलून तसेच गाडीचे मॉडिफिकेशन करून अनेक दुचाकीधारक अशाप्रकारचे फटाक्यांचा आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. या वाहनधारकांनी शहरात उच्छाद मांडला आहे. उत्सवाच्या प्रसंगी तर त्यांना अधिकच चेव येतो, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यानंतर आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.