Pune airport| पुण्यात लोहगाव विमातळावर विमानाचे टायर फुटले ; काही तासानंतर वाहतूक पूर्ववत

Pune airport|  पुण्यात लोहगाव विमातळावर विमानाचे टायर फुटले ; काही तासानंतर वाहतूक पूर्ववत
लोहगाव विमातळावर विमानाचे टायर फुटले
Image Credit source: TV9

या विमानतळावरून दिवसाला साधारण 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते.मात्र या घटनेमुळे या पुर्ण शेड्युलवर परिणाम होणार झाला आहे. याचा फटका विमानतळ प्रशासना सोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसला आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 30, 2022 | 6:00 PM

पुणे – शहरातील लोहगाव विमानतळावर (puneLohagav airport) सुखोई विमानाचा टायर फुटल्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दुपारच्या सुमारासही घटना घडली आहे. विमानाचा टायर फुटल्याने( plane’s tire burst), धावपट्टी देखील खराब झाली. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तात्काळ विमानसेवा बंद केली. यामुळे अनेक प्रवाशी विमानतळावरच अडकून पडले. तसेच विमातळावर मोठ्याप्रमाणात प्रवाश्यांची गर्दी निर्माण झाली होती. घटना घडल्यानंतर विमानतळ प्रशासनाने (airport administration) तात्काळ वाहतूक सेवा बंद केली व विमानाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हातात घेतले. यासगळ्याचा प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. काही तासानंतर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर  वाहतूक पूर्ववत झाली.

संपूर्ण शेड्युलवर परिणाम विमानतळावरून जाणाऱ्या विमानाचे टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. लोहगाव या विमानतळावरून दिवसाला साधारण 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते.मात्र या घटनेमुळे या पुर्ण शेड्युलवर परिणाम होणार झाला आहे. याचा फटका विमानतळ प्रशासना सोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. संचालकांना विचारले असता, त्यांनी या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असून, धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे. धावपट्टी दुरुस्त होत नाही तोपर्यंत अनेक प्रवाश्यांना तेथेच ताटकळत थांबावे लागणार आहे.

A Sukhoi-30 MKI fighter aircraft had a tyre burst while landing at the Pune airport leading to a blockage of the runway. The IAF personnel cleared the runway. After required checks, the runway was opened for flying operations: IAF officials

— ANI (@ANI) March 30, 2022

BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ

DA मध्ये झालेली वाढ पगारात नेमकी किती जास्त रक्कम टाकणार? जाणून घ्या संपूर्ण गणित!

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें