AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Encroachment : वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेलं अनधिकृत बांधकाम महापालिकेनं पाडलं, इम्तियाज जलील यांनी उठवला होता आवाज

कोंढवा-कात्रज रोडवरील आलमगीर मशिदीच्या जमिनीवर सर्व्हे क्रमांक 55येथे बांधकाम सुरू आहे. वक्फ जमीन हडपण्याचा हा प्रकार आहे. हे थांबणे आवश्यक आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांना एकत्र करून हे थांबवले पाहिजे. असे इम्तियाज जलील म्हणाले होते.

Pune Encroachment : वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेलं अनधिकृत बांधकाम महापालिकेनं पाडलं, इम्तियाज जलील यांनी उठवला होता आवाज
वक्फ बोर्डाच्या जागेवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकामImage Credit source: HT
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Sep 02, 2022 | 5:32 PM
Share

पुणे : वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या जागेवर (Waqf land) झालेले अनधिकृत बांधकाम पुणे महापालिकेने पाडले आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतचे ट्विट केले होते. सर्व्हे क्रमांक 55 वक्फ जमिनीच्या एका भागावर अनधिकृत बांधकामाची छायाचित्रे त्यांनी ट्विट केली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अतिक्रमण विरोधी विभागाने 4,000 चौरस फूट इमारत पाडली आहे, जी सर्व्हे नंबर 55 वक्फ बोर्डाच्या मालकीच्या एका भागावर उभारण्यात आली होती. कोंढवा-कात्रज रस्त्यावरील आलमगीर मशीद ट्रस्टच्या मालकीच्या वक्फ जमिनीवर हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते. इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 21 ऑगस्ट रोजी पुणे महापालिकेला ट्विट केले होते, की कोंढवा-कात्रज रोडवरील आलमगीर मशिदीच्या जमिनीवर सर्व्हे क्रमांक 55येथे बांधकाम सुरू आहे. वक्फ जमीन हडपण्याचा हा प्रकार आहे. हे थांबणे आवश्यक आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांना एकत्र करून हे थांबवले पाहिजे. असे ते म्हणाले होते.

‘इमारत बेकायदेशीर बांधकाम असल्याने पाडली’

माजी आयकर आयुक्त अकरमुल जब्बार खान आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला यांनी 25 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. महापालिका इमारत परवानगी विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, की वक्फ बोर्ड आमच्याकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली. ही इमारत बेकायदेशीर बांधकाम असल्याने पाडण्यात आली. पुण्याचे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान म्हणाले, की वक्फ जमिनीवर हे बेकायदेशीर बांधकाम होते आणि आम्ही महापालिका आणि पोलीस विभागाला कारवाईसाठी पत्र लिहिले होते. या घटनेसंदर्भात कोंढवा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

‘बेकायदेशीर धंदे हटवणे हे बोर्डाचे कर्तव्य’

17 जून रोजी, पुणे वक्फ बोर्डाने आठ जणांविरुद्ध पोलिसांच्या उपस्थितीत वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. माजी मुख्य आयुक्त खान म्हणाले, की आम्ही नोव्हेंबर 2016पासून अतिक्रमण काढण्यासाठी वक्फ बोर्डाच्या मागे लागलो आहोत. वक्फ मालमत्तेवरील बेकायदेशीर धंदे हटवणे हे बोर्डाचे कर्तव्य आहे. असे करण्यास विलंब झाल्यामुळे त्यानंतरच्या विक्रीमुळे अनेक अडचणी निर्माण होतात, जसे या प्रकरणात घडले.

‘अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली’

मुल्ला म्हणाले, जमिनीवर मोबाइल टॉवर, होर्डिंग्ज आणि इतर व्यावसायिक कामे सुरू असलेली अनेक अतिक्रमणे आहेत. आम्ही जमिनीवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी