AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षेत पास झाल्यानंतर भरतीच रद्द; PMPML च्या नोकरीसाठी पुण्यात आंदोलन

PMPML jobs | पीएमपीएमएलने 2016 साली 4900 वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. 1 जुलै 2017 ला यासाठी परीक्षा पार पाडली. यात जवळपास 261 उमेदवार पात्र ठरले.

परीक्षेत पास झाल्यानंतर भरतीच रद्द; PMPML च्या नोकरीसाठी पुण्यात आंदोलन
पीएमपीएमएलच्या पदांसाठी आंदोलन
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 05, 2021 | 2:45 PM
Share

पुणे: गेल्या 12 दिवसांपासून पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर वाहक पदाचे परीक्षार्थीचे आंदोलन सुरू आहे. 2016 साली पीएमपीएमलने (PMPML) वाहक पदासाठी ज्या उमेदवारांची भरती करण्याची हमी दिली होती, ती पूर्ण करण्याची मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.  (Protest in Pune for PMPML pending recruitment)

पीएमपीएमएलने 2016 साली 4900 वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. 1 जुलै 2017 ला यासाठी परीक्षा पार पाडली. यात जवळपास 261 उमेदवार पात्र ठरले. भरती प्रक्रिया टप्याटप्याने राबविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 400 उमेदवार पात्र ठरले. असे एकूण 661उमेदवार वाहक म्हणून रुजू झाले. थोड्या दिवसांनी तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. यात 1784उमेदवारांचा समावेश होता. मात्र थोड्या दिवसांत देशात लॉकडाऊन लागला. त्यामुळे ही यादी थांबवली गेली.

त्यावेळी पीएमपी प्रशासनने उमेदवारांना लॉकडाऊन निघाल्यावर तुम्हाला सेवेत सामावून घेऊ, असे सांगितले असल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे. मात्र पीएमपीने ही तिसरी यादी रद्द करून आता पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविले जाणार असल्याचे सांगितल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. तेव्हा नव्याने भरती प्रक्रिया न राबविता आधीच्या प्रक्रियेतील उमेदवाराचा यादी ग्राह्य धरावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे.

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार: अजित पवार

विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.

सगळं कामकाम बाजूला ठेवा, MPSC वर चर्चा करा

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत सगळं कामकाज बाजूला ठेऊन एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या: 

SSC CGL Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल टियर 1 परीक्षेच्या तारखा जाहीर, ऑगस्ट महिन्यात परीक्षा

Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड

(Protest in Pune for PMPML pending recruitment)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!