PMC election : दोन आठवड्यांत जाहीर होणार वेळापत्रक? पुणे महापालिकेत निवडणुकीची तयारी अन् लगबग

पुणे महानगरपालिकेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर एकूण 173 नगरसेवक निवडून येणार आहेत.

PMC election : दोन आठवड्यांत जाहीर होणार वेळापत्रक? पुणे महापालिकेत निवडणुकीची तयारी अन् लगबग
पुणे महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:30 AM

पुणे : राज्य निवडणूक आयोगाला (State election commission) येत्या दोन आठवड्यांत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने (Pune municipal corporation)महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने अलीकडेच मतदानाशी संबंधित साहित्य खरेदीसाठी 70 लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, मतदान केंद्र आणि मतदार याद्या तयार करण्यावर काम करत आहेत. आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप तपशीलवार कार्यक्रम प्राप्त झालेला नाही, परंतु शेवटच्या क्षणी गडगड आणि गर्दी टाळण्यासाठी पुढील काही दिवसांत प्राथमिक काम सुरू होईल, मतदानाशी (Voting)संबंधित कामांसाठी कर्मचारी आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तैनातीसाठी आम्ही लवकरच विविध सरकारी विभागांशी संपर्क साधू. असे सांगण्यात आले आहे.

‘अंतिम मसुदा अद्याप जाहीर नाही’

पुढे त्यांनी सांगितले, की प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी आम्ही विविध समित्या स्थापन करू. नामनिर्देशन प्रक्रिया हाताळण्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात कर्मचारी तैनात करावे लागतील. आणखी एका नागरी अधिकार्‍याने सांगितले, की महापालिकेच्या हद्दीत विलीन झालेल्या 23 पैकी सर्व गावांमध्ये प्रथमच नागरी निवडणुका होणार आहेत. या भागातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधत आहोत. सूचना आणि हरकती ऐकून दोन महिने झाले आहेत. मात्र, अंतिम मसुदा अद्याप जाहीर झालेला नाही. रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वॉर्डांच्या सीमांमध्ये बदल सुचवले आहेत, असे नागरी संस्थेच्या सूत्राने सांगितले.

निवडून येणार एकूण 173 नगरसेवक

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जिल्हा निवडणूक कार्यालयाने महापालिकेसोबत मतदार याद्या सामायिक केल्या आहेत. प्रभागांच्या हद्दीनुसार मतदार याद्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया प्रभागांचा अंतिम नकाशा तयार झाल्यानंतरच सुरू होईल. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर एकूण 173 नगरसेवक निवडून येणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.