कैदीही होणार आत्मनिर्भर!  शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज ; येरवडा कारागृहापासून होणार उपक्रमाला सुरवात

| Updated on: Mar 30, 2022 | 2:27 PM

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी. कैदयांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कर्जरूपाने रक्कम दिली जाणार आहे. हे कर्ज घेता असताना कैद्याला जामीनदार देण्याची आवश्यकता नसणार आहे. शिक्षा भोगत असताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक काम, त्यांना कारागृहात मिळणारे बंदीवेतन लक्षात घेत वैयक्तिक हमीवर हे कर्ज दिले जाणार आहे.

कैदीही होणार आत्मनिर्भर!  शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज ; येरवडा कारागृहापासून होणार उपक्रमाला सुरवात
yerwada jail
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे – राज्यातील वेगवेगळया कारागृहात ( prison)शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या सुधारणेसाठी कारागृह प्रशासन कायम प्रयत्न करत असते. याबरोबरच आता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांना 50  हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Home Minister Dilip Walse Patil) यांनी जाहीर केले आहे.राज्य सहकारी बँकेतून 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज 7 टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहातून(Yerawada Jail) केली जाणारा आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच या संदर्भातील शासननिर्णयही जारी करण्यात आलाय. कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे उपक्रम

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी. कैदयांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कर्जरूपाने रक्कम दिली जाणार आहे. हे कर्ज घेता असताना कैद्याला जामीनदार देण्याची आवश्यकता नसणार आहे. शिक्षा भोगत असताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक काम, त्यांना कारागृहात मिळणारे बंदीवेतन लक्षात घेत वैयक्तिक हमीवर हे कर्ज दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम असून 1055 कैद्यानावरील निकषांच्या आधारे हे कर्ज दिले जाणार आहे.

कुटुंबाचा विकास होण्यास मदत

कारागृहात शिक्षा भोगतअसलेल्या कैद्यांपैकी अनेक कैदी हे त्यांच्या कुटुंबातील कमावते असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळ त्यांच्या त्यांच्या कौटुंबावर गंभीर परिणाम होतो. याबरोबरच त्यांची आर्थिक स्थितीही खालावते. यातूनच कुटुंबीय नैराश्याच्या गर्तेत जातात. त्यांच्या मनातही अपराधीपणाची भावना निर्माण होते. यासगळ्यातून ते कुटूंब बाहेर यावे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी , या कर्जाऊ रूपाने मिळणाऱ्या पैश्याच्या रूपाने त्यांचा विकास व्हावा या विचारातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

VIDEO: सदिच्छा भेट होती, पण राजकीय चर्चा झाली, Varun Gandhi यांच्या भेटीनंतर राऊतांनी उडवला धुरळा

लातूर – मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनातील बिघाड दुरुस्त, वाहतूक पुर्वपदावर

Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; ‘श्रीवल्ली’वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!