Pune Cirme News | हॉटेल उघडण्यासाठी बनले गुन्हेगार, अल्पवयीन मुलाचे अपहरण अन्…

Pune Cirme News | पुणे शहरात अपहराणाचा थरार घडला होता. १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे तिच्या घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. आरोपींना हॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी अपहरण केले होते. पण पुढे असे काही झाले की...

Pune Cirme News | हॉटेल उघडण्यासाठी बनले गुन्हेगार, अल्पवयीन मुलाचे अपहरण अन्...
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 3:57 PM

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकीय मंडळांकडून सत्ताधारी पक्षाला घेरले जात आहे. यामुळे पुणे पोलिसांकडून अनेक उपाययोजना केली जात आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. पुण्यात नुकतेच १४ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्या मुलाच्या घरासमोरुनच भरदिवसा तिघांनी तिचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांना हॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी अपहरण नाट्य घडवून आणले. परंतु या नाट्याचा शेवट असा काही झाला की आरोपींना कायमचा लक्षात राहील.

कुठे घडला प्रकार

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे टाईमशिप जवळ ही घटना घडली. एका स्क्रॅप डिलरच्या मुलाचे अपहरण झाले. अपहणकर्त्यांनी काळया रंगाच्या झेन कारमधून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर मुलाच्या पालकांकडून ३० लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एका तपास पथकाची नियुक्ती केली गेली. आरोपींना केलेला फोनचा तपास केला. आरोपी सासवडला गेल्याचे स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

आरोपी सुरु करणार होते हॉटेल

पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या जागेचा शोध घेतला. त्याठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले आणि आरोपींना अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. पोलिसांनी तेजस लोखंडे, अर्जुन राठोड, विलास म्हस्के या आरोपींना अटक केली. या तिघांना त्या मुलाचे वडील श्रीमंत असल्याची माहिती होती. त्यामुळे लवकर पैसे कमवण्यासाठी त्यांनी मुलाच्या अपहरणाचा कट रचला. आरोपी या पैशांतून एक हॉटेल सुरु करणार होते. परंतु त्यांना आता कायमची शिक्षा मिळाली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.