AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune accident : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर खांबाला आदळला वाळू वाहतूक करणारा ट्रक, सुदैवानं जीवितहानी टळली

एक हायवा ट्रक नगरहून आळेफाट्याकडे जाताना बोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या (Transformer) खांबावर जाऊन आदळला व पलटी झाला. त्यामुळे वीजपुरवठा (Power supply) खंडित झाला.

Pune accident : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर खांबाला आदळला वाळू वाहतूक करणारा ट्रक, सुदैवानं जीवितहानी टळली
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर खांबाला आदळला ट्रकImage Credit source: Tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Mar 22, 2022 | 12:58 PM
Share

जयवंत शिरतर, पुणे :  वाळू वाहतूक व उपसा करण्याला बंदी असतानाही ही वाळू येतेच कुठून व जाते कुठे व कोणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नंबर नसलेल्या व भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू भरलेल्या वाहनांमुळे कल्याण-अहमदनगर महामार्ग हा दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. आज (दि. 22) मंगळवारी सकाळी सकाळीच एक हायवा ट्रक नगरहून आळेफाट्याकडे जाताना बोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या (Transformer) खांबावर जाऊन आदळला व पलटी झाला. त्यामुळे वीजपुरवठा (Power supply) खंडित झाला. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. महावितरण (MSEDCL) कंपनीचे कर्मचारी वेळेवर हजर झाल्याने त्यांनी या खांबावरचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला. परंतु यावेळी या हायवा ट्रकच्या जवळून जाणारे दुचाकीरील दोघेजण मात्र थोडक्यात बचावले.

मोठा अनर्थ टळला

जवळच एक विद्यालय आहे. भरण्यास वेळ असल्याने याठिकाणी शाळकरी मुलांची गर्दी नसल्याने फार मोठा अनर्थ टळल्याचे आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या ठिकाणी वाळूच्या गाड्यांना उभे राहण्यासाठीचा नाका असल्याने या रस्त्यावरून जाणारे नागरिक आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करतात.

महसूल व पोलीस खात्याला कल्पना नाही?

अपघात झाल्यानंतर अगदी काही वेळातच एक जेसीबी, दोन क्रेन, एक रिकामा हायवा, एक ट्रॕक्टर घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक हलविण्याचे काम करण्यात आले. तर महसूल व पोलीस खात्याला याची काहीही खबर नसल्याचे दिसते.

आणखी वाचा :

Junnar Leopard video : पिंपळगाव तर्फे नारायणगावात बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश

Pune crime : अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्या बिल्डर अन् वकिलांना बेड्या

Pimpri Chinchwad : महापालिका तिजोरीत मालमत्ताकरातून 483 कोटी 50 लाखांचा महसूल; 106 मालमत्ता सील

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट