पुणे ओशो आश्रम प्रशासन अन् अनुयायांमधला वाद विकोपाला, पोलिसांचा लाठीमार, काय आहे वादाचे कारण

जगभरातील आचार्य ओशो यांच्या भक्तांचे श्रध्दास्थान त्यांचे पुणे शहरातील आश्रम आहे. कारण त्या आश्रमात ओशो रजनीश यांचे समाधीस्थळ आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आश्रम प्रशासन आणि समर्थकांमध्ये वाद सुरु आहे. बुधवारी हा वाद अधिकच चिघळला.

पुणे ओशो आश्रम प्रशासन अन् अनुयायांमधला वाद विकोपाला, पोलिसांचा लाठीमार, काय आहे वादाचे कारण
आचार्य रजनीश उर्फ ओशोImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 3:28 PM

योगेश बोरसे, पुणे : ओशो इंटरशॅनल फाऊंडेशनकडून भक्तांना ओशो यांच्या समाधीस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भक्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पुन्हा आंदोलन सुरु केले. ओशो आश्रम प्रशासनाचा विरोध झुगारुन शेकडो जणांनी गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. यावेळी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माळा घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार केला.

ओशो भक्तांचे आंदोलन

हे सुद्धा वाचा

जगभरातील आचार्य ओशो यांच्या भक्तांचे श्रध्दास्थान त्यांचे पुणे शहरातील आश्रम आहे. कारण त्या आश्रमात ओशो रजनीश यांचे समाधीस्थळ आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी भक्त आले होते. परंतु त्यांना जाऊ दिले जात नाही. यामुळे भक्त आक्रमक झाले आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. भक्त आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला.

गेल्या अनेक दिवसांपासून ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमध्ये वाद सुरु आहे. गुढीपाडवा सण सर्वत्र साजरा होत असताना अनुयायांचे आंदोलन चिघळले. यावेळी ओश्रो समर्थक धक्काबुक्की करत आश्रमात प्रवेश करत होते. यामुळे पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

काय आहे वाद

मुंबई उच्च न्यायालयाने ओशो भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. तरीसुध्दा ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखले जात आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे. आता संन्याशी माळ घालून जात येणार नाही, असा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होतो. परंतु व्यवस्थपनांचा या निर्णयास ओशो समर्थकांनी विरोध केला.

काय आहे वाद

ओशो यांचा जन्म व मृत्यूही भारतात झाला आहे. ओशो यांनी त्यांचा सर्वाधिक काळ भारतात घालवला. त्यांची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे अधिकार पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय झाले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंच्या संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो. भारतातील ओशो आश्रमांना त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. पुण्यातील ट्रस्टची जमीन विकण्यावरुन भक्त आणि ट्रस्टमध्ये वाद सुरु आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.