Pune Vaccination center | पुण्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी पुणे प्रशासन सज्ज ; इथे मिळणार लस; एका क्लिकवर पहा लसीकरण केंद्रांची यादी

| Updated on: Jan 03, 2022 | 9:48 AM

पुणे शहरातील  १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना लास देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयातील एकूण ४० वेगवेगळ्या रुग्णालायातील लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

Pune Vaccination center | पुण्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी पुणे प्रशासन सज्ज ; इथे मिळणार लस; एका क्लिकवर पहा लसीकरण केंद्रांची यादी
सांकेतिक फोटो
Follow us on

पुणे – राज्यासह पुणे शहरात ओमायक्रॉनच्या विषाणूचा प्रसार वेगानेवाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील  १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना लास देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयातील एकूण ४० वेगवेगळ्या रुग्णालायातील लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयाल   व लसीकरण  केंद्रे 

  • औंधबाणेर क्षेत्रीय कार्यालयाल   –  बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना, औंध रोड , औंध कुटी रुग्णालय,  कै. सहदेव निम्हण हॉस्पीटल पाषाण
  • शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय –  दळवी रुग्णालय शिवाजी नगर
  •  सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय-  जनता वसाहत दवाखाना,जनता वसाहत,  कै .शांताबाई खंडेराव खडसरे दवाखाना, वडगाव,  कै . मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
  • वानवडी – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय – कै .नामदेवराव शिवरकर दवाखाना, वानवडी, मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती राहे ख्वाजा गरीब नवाज दवाखाना,मिठानगर
  • कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय – कै . कािशनाथ आनाजी धनकवडे प्रसृतीगृह, बालाजीनगर, सुखसागरनगर दवाखाना, राठी विहीरीमागे, माता रमाई आंबेडकर दवाखाना , साईनगर दवाखाना
  • कसबा -विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय – कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ ,कै .कलावती मावळे दवाखाना, नारायण पेठ, कै मातोश्री रमाबाई आंबेडकर दवाखाना , अंबील ओढा.
  • बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – सद्गुरू शंकर महाराज दवाखाना ,बिबवेवाडी,  स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना ,अप्पर इंदिरा नगर, व्ही आय टी युगपुरुष शिवछत्रपती दवाखाना,बिबवेवाडी(अप्पर)
  •  येरवडा – कळस – धानोरी – क्षेत्रीय कार्यालय- भारतरत्न स्व. .राजीव गांधी रुग्णालय येरवडा, कै गेनबा तुकाराम म्हस्के दवाखाना ,कळस
  • कोथरुड – बावधन- क्षेत्रीय कार्यालय – कै . सुंदराबाई गणपत राउत दवाखाना, केळेवाडी, कै जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल , कोथरूड
  • नगररोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय – कै .दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना, कल्याणीनगर, मीनाताई ठाकरे दवाखाना, वडगावशेरी
  • ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय – ताडीवाला रोड दवाखाना, डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालय, बी.टी. कवडेरोड दवाखाना घोरपडी गाव
  • धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय – कै .रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना,जांभुळवाडी रोड , आंबेगाव खुर्द,  कै शिवशंकर पोटे दवाखाना, सहकारनगर , स्व विलासराव तांबे दवाखाना,धनकवडी .
  • वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – कै .थरकुडे दवाखाना एरंडवणे, कै .बिंदूमाधव ठाकरे दवाखाना गोसावी वस्ती, कै .पृथक बराटे दवाखाना, रामनगर, गणपती माथा ,वारजे माळवाडी .
  • हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालय – कै.दशरथ बळीराम भानिगरेदवाखाना ,महमंदवाडी,  कै .अण्णासाहेब मगर दवाखाना, हडपसर,  कै .सखाराम कुंडिलक कोद्रे दवाखाना,मुंढवा.
  • भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय –कार्यालय, कै . मालती काची रुग्णालय,  कै .सावित्रीबाई फुले प्रसृतीगह , गुरुवार पेठ, कै.चंदुमामा सोनवणे प्रसृतीगह,तिसरा मजला

लसीकरणासाठी आवश्यक पात्रता

किशोरवयीन मुलाच्या लसीकरण करता असताना आरोग्य विभागाणे काहीनियमावली घालून दिली आहे.

यामध्ये २००७ पूर्वी जन्मलेली किशोर वयीन मुले यासाठी पात्र राहतील.

लाभार्थी किशोरवयीन मुलांना कोव्हॅक्सिन सिस्टिम स्वतःच्या मोबाईल द्वारे लसीकरणासाठी नोंदणी करावी.

लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्याकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे आवश्यक असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.  किशोरवयीन मुलांच्या  लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण केले जाणारा आहे.

Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा

मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2000 प्रवाशांची शिपवरच अडवणूक

Vinayak Chaturthi 2022 | पौष महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व काय? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजा करण्याची पद्धत