Pune News : अग्निवीरांची पहिली बॅच तयार, पाहा कशी झाली पासिंग आऊट परेड

Pune News : अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारकडून पात्रता वाढवली गेले. त्यानंतर बहुचर्चित अग्निवीरांची भरती प्रक्रिया राबवली गेली. आता या अग्निवीरांची पहिली बॅच तयार झाली आहे.

Pune News : अग्निवीरांची पहिली बॅच तयार, पाहा कशी झाली पासिंग आऊट परेड
agniveer army
| Updated on: Aug 14, 2023 | 12:41 PM

पुणे | 14 ऑगस्ट 2023 : गेल्या वर्षी नरेंद्र मोदी सरकारने तिन्ही सैन्यात भरतीसाठी अग्निवीर योजना (Agniveer New rule) आणली होती. त्यावेळी या योजनेवरुन वादही झाला. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यानंतर भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता वाढवली. त्यानंतर भरती प्रक्रिया राबवली गेली. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या अग्निवीरांची पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पुणे शहरात झाले. प्रशिक्षणानंतर ही बॅच तयार झाली आहे.

अग्निवीरांची पासिंग आऊट परेड

अग्निवीराच्या पहिल्या बॅचची पासिंग आऊट परेड पुणे शहरात १२ ऑगस्ट रोजी झाली. यामध्ये 41 अग्निवीरांनी पासिंग आउट परेडमध्ये सहभाग घेतला. पुण्यातील मिलिट्री इंटेलिजेंस ट्रेनिंग स्कूलमध्ये ही परेड झाली. यावेळी अग्निवीरांच्या आई, वडिलांना गौरव पदक भेट देण्यात आले. लेफ्टिनेंट जनरल प्रदीप कुमार चहल यांनी या परेडचे समीक्षण केले. देशातील ही पहिलीच अग्निवीरांची बॅच आहे. पासिंग आऊट परेडमधील उमेदवारांची ठिकठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.

कधी आली होती योजना

तिन्ही सशस्त्र दलात भरतासाठी जून 2022 मध्ये केंद्र सरकारने अग्निवीर योजनेची घोषणा केली होती. ही योजना केवळ लष्करातील भरतीसाठी आहे. या योजनेत भरती झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हटले जाते. या योजनेत हवाईदल, पायदळ आणि नौदल अशा तिन्ही दलासांठी भरती केली जाते. 17 ते 21 वर्ष वयाच्या युवकांना चार वर्षांसाठी अग्नीवीर म्हणून भरती केले जाते. यामधील 25 टक्के अग्निवीरांना 15 वर्षांपर्यंत सेवेत ठेवण्याची तरतूद केली आहे. 2022 याची मर्यादा 21 ऐवजी 23 वर्षांची केली गेली.

कोण ठरतात पात्र

केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीरसाठी सर्व शस्त्र दलासाठी अर्ज करू शकतात. तांत्रिक वर्गात अग्निवीर होण्यासाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. स्टोअर किपर अग्निवीर पदासाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ट्रेड्मन अग्निवीर पदांसाठी 8वी झालेला उमेदवारसुद्धा अर्ज करु शकतो. तसेच आयटीआय, पॉलिटेक्निक झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.