Pune Band : शिवरायांचा अवमान प्रकरण: पुण्यात कडकडीत बंद, पाहा पाच व्हीडिओ…

पुण्यात कडकडीत बंद...

Pune Band : शिवरायांचा अवमान प्रकरण: पुण्यात कडकडीत बंद, पाहा पाच व्हीडिओ...
| Updated on: Dec 13, 2022 | 12:09 PM

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी झाली. आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात (Pune Band) आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. कोश्यारींची लगोलग हकालपट्टी करा, अशी मागणी या संघटनांची आहे.

पुण्यातील डेक्कनमधल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून लाल महालपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.

भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसलेदेखील या मोर्चात सहभाग झाले आहेत.

उदयनराजे भोसले यांच्या सह शिवप्रेमींनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि या मोर्चाला सुरुवात झाली.

पुण्यातील बंदमध्ये विरोधी पक्षातील पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. भाजप आणि मनसे या मोर्चात सहभागी झालेले नाहीत.