AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | भेसळ करणाऱ्याविरोधात FDA ॲक्शन मोडमध्ये, पुणे शहरातील या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

Pune honey Trap | गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी पुणे अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. या काळात भेसळ करणाऱ्याविरोधात मोहीम सुरु केली आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे.

Pune News | भेसळ करणाऱ्याविरोधात FDA ॲक्शन मोडमध्ये, पुणे शहरातील या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 17, 2023 | 9:47 AM
Share

पुणे | 17 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत म्हणून अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरात विक्रीसाठी आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी एफडीआय करणार आहेत. सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी पुणे शहरात एक समितीची स्थापन करण्यात आली आहे. आता गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम राहणार सुरू आहे. नियम न पाळणाऱ्या खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

पुणे शहरात जड वाहनांना बंदी

पुणे शहरात गणेशोत्सवात दरम्यान जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी असणार आहे. या दरम्यान शहरात कोणत्याही जड वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. पुणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुणे शहरातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड, एफसी कॉलेज रोडवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

प्राण्याची काळजी घेतली नाही, गुन्हा दाखल

पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य वन विभागाकडून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा केला आहे. अनाथालयात प्राण्यांच्या सुरक्षितेची काळजी त्यांनी घेतली नाही. तसेच उपचारांसाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे परवानगीशिवाय प्रजनन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनाथालयात दाखल झालेले वन्य प्राणी आणि निसर्गात सोडलेल्या वन्य प्राण्यांच्या नोंदीमध्ये तफावत आढळली आहे.

पुणे शहरातून गणेशोत्सवासाठी 190 जादा बसेस

पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातून गावी जाण्यासाठी या बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुणे बसस्थानकावर नागरिकांची चांगलीच गर्दी झाली आहे. स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानकावरुन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाण्यासाठी नागरिकांची बस स्थानकांवर चांगलीच गर्दी झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडल्या जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, पुणे शहरात रॅली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “पुणे ऑन पॅडल्स” या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरुड विधासभा मतदार संघाच्या माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, भाजपचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?