PMC Election 2026 : अजित पवारांकडून अशी ऑफर काका शरद पवार नाराज, अर्ध्या रात्री दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली

PMC Election 2026 : पुण्यातील एका हॉटेलमध्ये मविआची बैठक झाली. शरद पवार गटाकडून या बैठकीला बापूसाहेब पठारे, अंकुश काकडे, काँग्रेसकडून अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वसंत मोरे उपस्थित होते.

PMC Election 2026 : अजित पवारांकडून अशी ऑफर काका शरद पवार नाराज, अर्ध्या रात्री दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली
Ajit Pawar-Sharad Pawar
| Updated on: Dec 27, 2025 | 9:01 AM

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांच सत्र सुरु होतं. पण आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. ही संभाव्य आघाडी तुटल्यात जमा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन पेच होताच. पण सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला अशी ऑफर दिली की, ते हा प्रस्ताव मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यात जमा असल्याची सूत्रांची माहिती आहे. घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवारांनी प्रस्ताव दिला होता. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही.

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतून लढण्याची शक्यता आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची पुण्यात रात्री बैठक झाली. काल अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे चर्चा करण्यासाठी गेले होते. पण अजित पवारांकडून शरद पवारांसमोर घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण शरद पवार पक्षाचे नेते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. अधिकच्या जागा सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाकडून अजित पवारांकडे मागण्यात आल्या होत्या.

आज काय जाहीर होऊ शकतं?

पण पालिका निवडणुकीसाठी घड्याळाचं चिन्ह शरद पवार पक्षातील अनेक नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील ही शक्यता मावळली आहे. काल रात्री महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. मविआ मनसेला पुणे महापालिका निवडणुकीसाठी सोबत घेणार का? हे लवकरच समजेल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी प्राथमिक चर्चा झाल्या होत्या. तीन बैठका झाल्या होत्या. पण अजित पवारांचा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शरद पवार पक्षाला मान्य नाही. आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबद्दल सूतोवाच केलं जाऊ शकतं.