AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ

Pune Air Service | दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

आनंदाची बातमी: पुण्यातून देशातील 21 शहरांसाठी विमानसेवा; 20 ऑगस्टपासून प्रारंभ
पुणे विमानतळ
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 10:53 AM
Share

पुणे: पुण्यातून आता देशातील 21 शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी 20ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी 21 ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल.

तर दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (Nanded to Mumbai Ahmedabad jalgaon daily flight, Minister Ashok Chavan efforts)

नांदेबरोबरच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

विमानाचं टाईमटेबल…

मुंबईतून 1 वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर 7 वाजून 5 मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.