AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बस्स! कुठल्याही व्यासपीठावर या.., असीम सरोदेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ओपन चॅलेंज

सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी थेट विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चॅलेंज केलं आहे.

आता बस्स! कुठल्याही व्यासपीठावर या.., असीम सरोदेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ओपन चॅलेंज
Asim SarodeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 1:33 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे.  आज देखील या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये युक्तीवाद होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं होतं. ‘मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत असून, त्यात कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही. मी घेतलेली भूमिका, आणि दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत राहून घेतला आहे,’ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं  होतं. राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी थेट राहुल नार्वेकर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ‘राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांना ज्या वकिलांचा सल्ला घेऊन यायचे आहे त्यांनी यावे,महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात माझ्याशी कायदेशीर जाहीर वादविवाद ठेवावा आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटवून द्यावे. ‘  असं ट्विट सरोदे यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरोदे? 

‘राहुल नार्वेकर यांना शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय संपूर्णपणे बेकायदेशीर आहे हे मी वारंवार सांगतोय आणि सांगत राहील. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह इतर चार न्यायाधीशांनी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनेक पानांवर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या बेकायदेशीर व घटनाबाहय निर्णयांचे उल्लेख आहेत. कपिल सिब्बल केवळ कुणा पक्षकारांची बाजू मांडत नाहीयेत तर संविधान व लोकशाहीची बाजू मांडत आहेत. पण संविधानाशी बेईमानी करून या देशाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या सत्तालोलुप लोकांना ते समजून घेताच येणार नाही. राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांना ज्या वकिलांचा सल्ला घेऊन यायचे आहे त्यांनी यावे,महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात माझ्याशी कायदेशीर जाहीर वादविवाद ठेवावा आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटवून द्यावे. अहो नार्वेकर साहेब किती नुकसान करणार लोकशाही यंत्रणांचे ? आता बस्स !’ असं ट्विट सरोदे यांनी केलं आहे.

आज पुन्हा सुनावणी 

दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडणार आहे. ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केल्याचं पहायला मिळालं आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर