AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबांना फोन आला, त्याने जेट एअरवेजचं नाव घेतलं अन्… पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल!

पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन १०.७५ कोटी रुपयांना लुटले. सायबर चोरट्यांनी व्हर्च्युअल कोर्टाचा बनाव रचून ही फसवणूक केली आहे.

आजोबांना फोन आला, त्याने जेट एअरवेजचं नाव घेतलं अन्... पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल!
cyber crime
| Updated on: Feb 06, 2026 | 1:54 PM
Share

पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भांडारकर रोड परिसरात एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. एका ८२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी १० कोटी ७५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. यासाठी चक्क व्हर्च्युअल कोर्ट (आभासी न्यायालय) तयार करुन आणि डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावून हा गंडा घालण्यात आला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे भांडारकर रोड परिसरात राहतात. ते निवृत्त झाले आहेत. २३ जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण केंद्रीय तपास यंत्रणेचे (CBI) अधिकारी असल्याचे भासवले. देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झाले आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर करून २४ वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. त्यातून बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत, अशी भीती चोरट्यांनी त्यांना घातली.

यानंतर तपासाच्या नावाखाली चोरट्यांनी २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात वृद्धाला डिजिटल अरेस्ट (डिजिटल नजरकैद) मध्ये ठेवले होते. तुम्हाला ७ ते ९ वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी धमकी देऊन त्यांना कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सर्व बँक खात्यांची माहिती अत्यंत चालाखीने काढून घेतली.

व्हर्च्युअल कोर्ट उभं केलं अन्…

तसेच २४ जानेवारीला चोरट्यांनी फिर्यादींना व्हिडीओ कॉल केला. हा कॉल उचलल्यानंतर वृद्ध व्यक्तीला समोर चक्क न्यायालयाचे दृश्य दिसले. चोरट्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एक व्हर्च्युअल कोर्ट उभे केले होते. यात एक व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसली होती. तर दुसऱ्याने सरकारी वकील असल्याचे भासवले. या बनावट न्यायाधीशाने त्यांची चौकशी केली. यानंतर त्यांना तपासासाठी तुमची सर्व मालमत्ता सरकारी खात्यात पडताळणीसाठी जमा करावी लागेल, असे आदेश दिले.

यानंतर दबावाखाली आलेल्या ८२ वर्षीय वृद्धाने आपल्या बँक खात्यातील रक्कम आणि मुदत ठेवी (FD) तोडून तब्बल १० कोटी ७५ लाख रुपये चोरट्यांनी दिलेल्या ७ वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केले. हे पैसे जमा झाल्यानंतर आता तुमची सुटका झाली आहे, तुम्ही ही माहिती तुमच्या कुटुंबाला सांगू शकता, असे सांगत चोरट्यांनी संपर्क तोडला.

सायबर पोलिसात तक्रार दाखल

यानंतर जेव्हा पीडित वृद्धाने घडलेला सर्व प्रकार आपल्या मुलीला सांगितला, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने पुणे सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा