AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | बिल्डर डीएसकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे देणार? डीएसकेने काय घेतली भूमिका

Pune News | पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक डीएसके अडचणीत आला आहे. डीएसकेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आता ही मालमत्ता विकून गुंतवणूक केलेल्या ठेविदारांना पैसे द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यावर डीएसकेकडून म्हणणे मांडण्यात आलेय.

Pune News | बिल्डर डीएसकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे देणार? डीएसकेने काय घेतली भूमिका
Pune Dsk
| Updated on: Nov 02, 2023 | 2:11 PM
Share

पुणे | 22 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिक डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांच्या योजनेत अनेक ठेवीदारांनी गुंतवणूक केली होती. डीएसके यांनी नऊ हजार गुंतवणूकदारांची सुमारे 800 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात डीएसके यांना अटकही झाली होती. आता ठेवीदारांनी पैसे मिळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. डीएसकेची मालमत्ता विकून हे पैसे देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. त्यावर डीएसकेने आपले म्हणणे सादर केले आहे.

काय केली ठेवीदारांनी मागणी

डीएसके यांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी ठेवीदारांनी केली केली आहे. डीएसके यांच्या नावावर 335 स्थावर मालमत्ता आहेत. त्यातील 71 मालमत्ता डीएसके यांच्या भागीदारी कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. यामुळे डीएसके यांनी मालमत्ता विकू नये, अशी भूमिका घेतली आहे. भागीदारी कंपन्यांच्या मालमत्ता विकू नये, असे म्हणणे त्यांनी मांडले आहे. आता यासंदर्भात न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

काय होती ठेवीदारांची मागणी

ठेवीदारांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणी मुंबईतील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात ठेवीदारांनी केली आहे. ठेवीदारांकडून अ‍ॅड. चंद्रकांत बिडकर यांच्यामार्फत ही मागणी न्यायालयात केली आहे. तसेच जोपर्यंत सर्व ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत डीएसकीची कोणतीही मालमत्ता मुक्त करु नये, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली आहे. परंतु या अर्जावर डीएसके यांनी आक्षेप घेतला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

डीएसके यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले होते. परंतु लोकांकडून घेतलेले पैसेही त्यांना परत देता आले नाही. त्यामुळे त्यांना अटकही झाली होती. आता ठेवीदारांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते? याकडे सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. ठेवीदारांना आपले पैसे लवकरात लवकर परत मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु ठेवीदारांच्या मागणीला डीएसके यांनी विरोध केला आहे.

नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज
नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज.
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत.
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.