AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandu Andekar : आंदेकरने माझ्या मुलाला विकासासाठी मारलं का? पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज पुन्हा भरणार अर्ज

Bandu Andekar :या दरम्यान त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला होता. दोन्ही हात रशीने बांधलेले होते. त्याला सरकारी केंद्रात नेत असताना आंदेकरने स्वत:साठी 'आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत' अशी घोषणाबाजी केली.

Bandu Andekar : आंदेकरने माझ्या मुलाला विकासासाठी मारलं का? पुण्याचा कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज पुन्हा भरणार अर्ज
bandu andekar
| Updated on: Dec 29, 2025 | 10:25 AM
Share

पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहे. 27 डिसेंबरला तो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र कागदपत्र पूर्ण नसल्याने फॉर्मचा स्वीकार झाला नाही. आज 29 डिसेंबरला फॉर्म दाखल करण्यासाठी तो पुन्हा जाईल. पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंदेकरला सर्शत परवानगी दिली होती. याच आदेशानंतर 27 डिसेंबरला त्याला येरवडा केंद्रीय तुरुंगातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोलीस व्हॅनमधून भवानी पेठ येथील सरकारी केंद्रात आणण्यात आलं. या दरम्यान त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला होता. दोन्ही हात रशीने बांधलेले होते. त्याला सरकारी केंद्रात नेत असताना आंदेकरने स्वत:साठी आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत अशी घोषणाबाजी केली.

निवडणूक अधिकाऱ्यांनुसार बंडू आंदेकरने प्रस्तुत केलेला उमेदवारी अर्ज अपूर्ण होता. म्हणून तो तात्काळ स्वीकारण्यात आला नाही. आवश्यक कागदपत्र जमा न केल्यामुळे प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. आंदेकरचे वकील मिथुन चव्हाण म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काही औपचारिक कागदपत्रं बाकी आहेत. पीटीआयनुसार, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आंदेकरला 29 डिसेंबरला पुन्हा नामांकन प्रक्रिया करावी लागेल. मिथुन चव्हाण यांच्यानुसार आंदेकर भवानी पेठ वॉर्ड कार्यालयातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा

आंदेकरची वहिनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी सुद्धा न्यायालयाच्या परवानगी नंतर आपला-आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोघी सुद्धा आयुषच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. आयुषची पाच सप्टेंबरला नाना पेठ भागात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तो गणेश कोमकर यांचा मुलगा होता. आयुष कोमकरच्या आईने बंडू आंदेकरला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. आयुष कोमकरच्या आईने तीव्र शब्दांत आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, आंदेकरने माझ्या मुलाला विकासासाठी मारलं का? मुंबई, पुणेसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.

ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.