पुणेकरांनो, थर्टी फर्स्टला दारु पिण्यासाठी लागणार परवाना, पाहा कुठे आणि किती रुपयांत मिळणार?

नागरिकांकडून थर्टी फर्स्टला सेलिब्रेशन करुन नव्या वर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवरच पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

पुणेकरांनो, थर्टी फर्स्टला दारु पिण्यासाठी लागणार परवाना, पाहा कुठे आणि किती रुपयांत मिळणार?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 5:21 PM

योगेश बोरसे, पुणे : वर्षाचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट. हा दिवस सर्वांचा आवडता दिवस असतो. या दिवशी खूप मजामस्ती केली जातेय. मद्यप्रेमींकडून मनसोक्तपणे मद्यप्राशन करुन सेलिब्रेशन केलं जातं. नागरिकांकडून सेलिब्रेशन करुन नव्या वर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवरच पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. पुणेकरांचा थर्टी फर्स्ट यंदा जोरात साजरा होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वन डे परमिट दिलंय. हे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

यावर्षी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार मद्य परवाने (देशी-विदेशी दारू) म्हणजेच “वन डे परमिट” देण्यात आले आहे. हे परवाने हॉटेल, बार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलीय. वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची 31 डिसेंबरला करडी नजर असणार आहे.

राज्य उत्पादनक शुल्क विभागाच्या नियमांनुसार, विना परवाना मद्य प्राशन किंवा विक्री केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यात यंदा 31 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्काचे 10 विशेष पथकं करडी नजर ठेवणार आहेत.

रात्रीच्या गस्ती, अनधिकृत ढाबे, फार्म हाउस तसेच संशयित गाड्यांची तपासणी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी याबाबत माहिती दिलीय.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात 240 गुन्हे दाखल झाले आहेत.

डिसेंबर महिन्यात 17 वाहनं जप्त करण्यात आले आहेत. तर 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.