चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ काल रात्री सापडलं होतं. (Pune Four Months old Baby abandoned at Chandani Chowk Shrubs Mother Found)

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 12:43 PM

पुणे : चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडून जाणाऱ्या पाषाणहृदयी आईला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बेड्या ठोकल्या. (Pune Four Months old Baby abandoned at Chandani Chowk Shrubs Mother Found)

महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. चार महिन्यांच्या बाळाला रस्त्यात सोडल्याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केला होता. या अंतर्गत तिला अटक करण्यात आली आहे.

चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ काल रात्री सापडलं होतं. बाळाबद्दलची बातमी समजताच वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते.

दृष्ट लागू नये म्हणून गालाला टिक्का

कानाला वारा लागू नये म्हणून बाळाच्या डोक्याला कानटोपी गुंडाळलेली होती. कपाळावर छानसा काळा टिळा होता. दृष्ट लागू नये म्हणून गालाला हलकासा काळा टिक्का लावलेला. अंगात फुल बाह्यांचा निळा शर्ट, त्यावर एक पांढरा शर्ट, गुलाबी फुल पँट, पायात मोजे, थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरलेली निळी शाल असे सर्व तऱ्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते.

वाहतूक पोलिसांनी या बाळाला कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर या बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांना या बाळाबद्दल काहीही माहिती असल्यास कोथरुड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक यांची मदत घेत पोलिसांनीच या मातेला शोधून काढले.

(Pune Four Months old Baby abandoned at Chandani Chowk Shrubs Mother Found)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.