AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganesh Utsav | गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी असा केला प्लॅन, हजारो कर्मचारी, सीसीटीव्हींची नजर अन्…

ganesh chaturthi 2023 | पुणे शहरातील गणेशोत्सवाकडे देशाचे लक्ष असते. पुणे शहरातील गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. दहा दिवस पुण्यात उत्सवाची जोरदार तयारी असते. पुणे पोलिसांनी तयारी केलीय...

Pune Ganesh Utsav | गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी असा केला प्लॅन, हजारो कर्मचारी, सीसीटीव्हींची नजर अन्...
Pune Ganesh UtsavImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 17, 2023 | 1:55 PM
Share

अभिजित पोते. पुणे | 17 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. गणेश मंडळांचे आरास तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घराघरात गणरायाच्या आगमनाची तयारी केली जात आहे. त्याचवेळी हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात सूक्ष्म नियोजन केले आहे. हजारो पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तंत्रज्ञानाचा वापर करुन २४ तास शहरातील महत्वाचे भाग पोलिसांच्या निगराणीत राहणार आहे.

कशी आहे पोलिसांची तयारी

गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांची तयारी काय? यासंदर्भात बोलताना सहायक पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनी गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांची नजर सर्वत्र राहणार आहे. त्यासाठी 7000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरात सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्सेस देखील पुण्यामध्ये तैनात असणार आहे.

बॉम्ब शोधक पथक अन् सीसीटीव्ही

पुणे शहराची तपासणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून वारंवार करण्यात येणार आहे. दिवसभर शहरातील विविध भागावर या पथकाचे लक्ष असणार आहे. शहरात १ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जणार आहे. सीआरपीएफच्या पाच तुकड्या गणेशोत्सवात पुणे शहरात असणार आहे. तसेच साध्या वेशातील पोलिसांच्या तुकड्यांचे लक्ष असणार आहे. क्यूआरटी पथकाचा वापर करण्यात येणार आहे. एक हजार होम गार्ड आणि पोलीस मित्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी असणार आहे.

गणरायांच्या आगमनाला उरले काही तास

१९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. यामुळे पुणे शहरातील गणेश मूर्ती कार्यशाळेत मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. गणेश मूर्ती कार्यशाळेत बाप्पांच्या अनेक मूर्त्या बनून तयार झाल्या आहेत. वेगवेगळ्या रूपातील बाप्पांच्या मूर्त्या भाविकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रविवारचे निमित्त साधून भाविक पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?