गुढी पाडव्यासाठी आंबे खरेदीला जाताय, आधी दर पाहून जा

| Updated on: Mar 21, 2023 | 11:43 AM

गुढीपाडवा बुधवारी साजरा होणार आहे. गुढीपाडव्यापासून अनेक कुटुंबीय आंबे खाण्यास सुरवात करतात. यामुळे गुढी पाडव्याच्या निमित्ताने हापूस आंबा पुणे बाजारात आला आहे. आंबा खरेदीसाठी मंगळवारी पुणेकरांनी मार्केटयार्डमध्ये गर्दी केली. परंतु दर अजून चढेच आहेत.

गुढी पाडव्यासाठी आंबे खरेदीला जाताय, आधी दर पाहून जा
हापूस आंबे
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पुणे मार्केट यार्डात (Pune Marketyard) आंब्याची आवक सुरु आहे. गुढीपाडव्याचे निमित्त साधून गेल्या काही दिवसांत गुलटेकडी येथे आंब्याची चांगली आवक होता आहे. गुढीपाडव्यामुळे हापूस (Hapus) आंब्याचे दर वाढले आहेत.अवकाळाची कोकणातील आब्यांला फटका बसला आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) पुणे नुसार, जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केट यार्डात आली आणि तेव्हापासून दर फारसे कमी झालेले नाही.

गुढीपाडव्यापासून आंबे खाण्यास सुरवात केली जाते. त्यामुळे कोकणातून गुढी पाडव्याच्या निमित्ताने आंबा पुणे बाजारात आला आहे. आंबा खरेदीसाठी मंगळवारी पुणेकरांनी मार्केटयार्डमध्ये गर्दी केली. कोकणातील हापूस आंब्याला मागणी होत आहे. परंतु आंब्याचा दर डझनाला एका हजारांपेक्षा जास्त आहे. नुकताच झालेल्या अवकाळाची फटका कोकणातील आब्यांला बसला आहे. त्यामुळे दर अजून जास्त आहे. पुढील महिन्यात हापूस आंब्याचे दर कमी होतील, असे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

आवक चांगली

गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात हापूस आंब्याची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या साठ्याची चांगली आवक होत आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर फळांच्या आकारानुसार चार ते सहा डझन पेट्यांसाठी ठरवले जात आहेत. परंतु हे दर सरासरी एक हजार रुपये डझनवर जात आहे.

गुढीपाडव्याचे मुहूर्त

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2023) होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. याशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक गुडी उभारण्याची परंपरा आहे. मराठी लोकं गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून पूजा करतात.

हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याची तारीख, पूजा पद्धत, कथा आणि महत्त्व जाणून घेउया. यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे, 22 मार्च 2023 रोजी 06:29 ते 07:39 ही वेळ पूजेसाठी शुभ राहील.