AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ससून रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या समितीला बिर्याणीच्या मेजवानीचा घाट, पुण्यात चर्चांना उधाण

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाचं आणि बिर्याणीचं अनोखं नातं आहे की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण सुरुवातीला पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बिर्याणी खाऊ घातल्याची चर्चा होती. यानंतर आता याप्रकरणी ससून रुग्णालयात झालेल्या ब्लड सॅम्पलच्या गैरप्रकाराबद्दल चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली आहे, त्या समितीला पुण्यातील प्रसिद्ध बिर्याणीच्या मेजवानीचा घाट घालण्यात आला.

ससून रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या समितीला बिर्याणीच्या मेजवानीचा घाट, पुण्यात चर्चांना उधाण
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 28, 2024 | 7:40 PM
Share

पुणे हिट अँड रन प्रकरणात पुन्हा एकदा आता बिर्याणीची एन्ट्री झाली आहे. पुण्यात एका श्रीमंत बापाच्या मुलाने त्याच्या पौर्शे कारने दोन जीवांना धडक दिली. या अपघातात दोन जीवांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पैशांच्या जोरावर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्ट करण्यात आलं. ससून रुग्णालयात आरोपीला मेडिकलला नेलं असता त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आली. अल्पवयीन आरोपी हा दारु प्यायलेला असताना त्याच्या रक्तात दारु आढळली नाही, असा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला. याप्रकणी पुणे पोलिसांनी तपास केला असता आरोपीच्या वडिलांनी 3 लाखांची लाच देवून तिथल्या डॉक्टरांना ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यास सांगितल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत सरकारने तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. या समितीने आज मेजवानीचा आस्वाद घेत चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी केली. बिर्याणीच्या बॅगा ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये घेऊन जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

चौकशी समितीकडून सकाळी अकरा वाजता चौकशीला सुरुवात झाली. राज्य सरकारने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लँड सॅम्पलमध्ये फेरफार कशी झाली? याची चौकशी करत आहे. ही समिती ससून रुग्णालयाच्या प्रशासनाची चौकशी करत आहे. गेल्या सात तासांपासून चौकशी समितीचं काम करत आहे. या दरम्यान या चौकशी समितीला ससून रुग्णालयाच्या डीनकडून पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीचा पाहुणचार करण्यात आला. त्यामुळे पुण्यात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

ही समिती आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. कारण या समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर विरोधकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. कारण पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तरीसुद्धा सरकारने पल्लवी सापळे यांची चौकशी समितीच्या प्रमुखपदी नेमणूक केली. त्यानंतर ज्याप्रकारे या चौकशी समितीने ससून रुग्णालयात मेजवानी घेतली याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे एवढी मोठी दुखद घटना घडलेली असताना चौकशी समितीकडून अशाप्रकारे प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मानला जात असल्याची चर्चा आता पुण्यात होत आहे. याआधी पुणे पोलिसांमधील बिर्याणीची चर्चा ऐकायला मिळाली होती. त्यानंतर या अपघात प्रकरणात पुन्हा बिर्याणीची एन्ट्री झालीय.

या समितीने आज ससून रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांची चौकशी या समितीने केली. या दरम्यान मधल्या वेळेत ससून रुग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये प्रसिद्ध बिर्याणीच्या मेजवानीचा घाट घालण्यात आला. यानंतर आता चौकशी समिती ससून रुग्णालयाच्या बाहेर पडणार आहे. चौकशीतून काय निष्पन्न झालं याबाबत ते माहिती देऊ शकतात. या चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. यानंतर दोषींवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या चौकशी समितीच्या मेजवानीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना