AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Housing sales | पुणे शहरात घरांच्या विक्रीत तीन महिन्यांत मोठी वाढ, देशात पुणे पहिल्या क्रमांकवर

Pune Housing sales | पुणे शहरासह देशातील सात मेट्रो शहरांमध्ये घरांची विक्री कशी होत आहे, यासंदर्भातील माहिती जारी झाली आहे. देशात गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक विक्री पुणे शहरात झाली आहे. यासंदर्भातील अहवाल आला आहे.

Pune Housing sales | पुणे शहरात घरांच्या विक्रीत तीन महिन्यांत मोठी वाढ, देशात पुणे पहिल्या क्रमांकवर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 28, 2023 | 1:20 PM
Share

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती…या कवितेप्रमाणे एक घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक सामान्यांचे असते. त्यात पुणे शहरातील वातावरण आणि इतर सुविधा चांगल्या असल्यामुळे या ठिकाणी घरे घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. पुणे शहरात शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तसेच घरे बजेटमध्ये मिळत आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून व्याजदारात कपात केली गेली नाही, त्यानंतर पुणे शहरात घरांची मागणी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत घरांना कुठे अन् किती मागणी आली, ही माहिती समोर आली आहे.

देशात कशी आहे परिस्थिती

गेल्या तीन महिन्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर देशभरात विक्रमी घरांची विक्री झाली आहे. या तीन महिन्यांत मागील वर्षाच्या तुलनेत 36 टक्के घरांची विक्री वाढली आहे. तब्बल 1 लाख 20 हजार 280 घरांची विक्री सात प्रमुख शहरांमध्ये झाली आहे. ॲनारॉक या संस्थेने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार मागील वर्षी या तीन महिन्यांत 88 हजार 230 घरांची विक्री झाली होती, ती आता 1 लाख 20 हजार 280 आहे.

घरांची किंमती किती वाढल्या

ॲनारॉकच्या अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर या कालावधीत सात शहरांमधील घरांच्या किंमती 11 टक्के वाढल्या आहेत. त्यात सर्वाधिक वाढ हैदराबादमध्ये 18 टक्के झाली आहे. जुलै-सप्टेंबरमधील तिमाही विक्रीत आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. या विक्रीत अपार्टमेंट, व्हिला आणि स्वतंत्र मजल्यांची विक्रीचा समावेश केला आहे.

पुणे, मुंबईचा वाटा सर्वाधिक

ॲनारॉक चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, एकूण विक्रीत मुंबई आणि पुणे यांचा वाटा सर्वाधिक 51 टक्के आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात काही बदल केला नाही. यामुळे गृहकर्जाचे दर जास्त आहे. त्यानंतरही घरांची मागणी वाढली आहे. पुण्यात घरांची विक्री 14,080 वरुन 22,885 झाली आहे. ही वाढ टक्केवारीत 63 टक्के आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. नजीकच्या भविष्यातही हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?