VIDEO | बाईकच्या समोरच्या भागात घुसलेल्या नागाची थरारक सुटका

| Updated on: Aug 03, 2021 | 3:45 PM

प्राध्यापक भोंग आपली बाईक घेऊन शेतात गेले. गाडी बंद केल्यानंतर फुस-फुस असा आवाज त्यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी बाईकच्या हँडलवरील भागात पाहिलं असता त्यांना नाग दिसला.

VIDEO | बाईकच्या समोरच्या भागात घुसलेल्या नागाची थरारक सुटका
बाईकच्या पुढील भागातून नागाची सुटका
Follow us on

पुणे : बाईकच्या समोरच्या भागात शिरलेल्या नागाची सुटका करण्यात यश आलं आहे. सर्पमित्राने बाईकमध्ये अडकलेल्या पाच फुटांच्या कोब्राला सुखरुप वाचवलं. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी भागात हा प्रकार घडला. नागाच्या सुटकेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

प्रा. सोपान भोंग यांच्या दुचाकीच्या समोरच्या भागात नाग शिरला होता. सकाळी प्राध्यापक भोंग आपली बाईक घेऊन शेतात गेले. गाडी बंद केल्यानंतर फुस-फुस असा आवाज त्यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी बाईकच्या हँडलवरील भागात पाहिलं असता त्यांना नाग दिसला. तो काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु नाग अडकल्याने त्यांना काढता आला नाही.

बाईक चालवत ते गावातील गॅरेजमध्ये गेले. फिटरने बाईकची खोपडी (पुढील भाग) उघडल्यानंतर भोंग यांनी हळूहळू त्याला इजा न होऊ देता बाहेर काढले. तो पाच फूट लांबीचा इंडियन कोब्रा जातीचा नाग निघाला. यानंतर भोंग यांनी त्याला वन परिसरात सोडून दिले. पावसाळ्यात साप-नाग हे बाईक किंवा कार यांच्या विविध भागात शिरतात त्यामुळे वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्पमित्र भोंग यांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | गिरीश महाजन पुन्हा ‘संकटमोचक’, जळगावात सापाला पकडून जीवदान, थरार कॅमेरात कैद

Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ