AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune isis module : एनआयएचा मोठा निर्णय, पुणे इसिस मॉड्यूलमधील चौघे आरोपींवर लाखोंचे बक्षिस

Nia cash reward on pune isis module : पुणे शहरात इसिस मॉड्यूलचा प्रकार उघड झाला होता. यानंतर तपास संस्थांचे लक्ष पुणे शहरावर आहे. आता पुन्हा एनआयएने पुणे इसिस मॉडूलचा पर्दाफाश करण्यासाठी पावले उचलली आहे.

pune isis module : एनआयएचा मोठा निर्णय, पुणे इसिस मॉड्यूलमधील चौघे आरोपींवर लाखोंचे बक्षिस
nia Image Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 12, 2023 | 2:47 PM
Share

पुणे | 12 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी असल्याचे तपासातून उघड झाले होते. पुणे शहरात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे खळबळ माजली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत तपास सुरु केला. आता एनआयएकडून या प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई केली जात आहे. या प्रकरणातील चार आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षिस एनआयएने जाहीर केले आहे.

चार वॉटेंड आरोपीवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.  आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे बक्षिस दिले जाणार आहे. महमद शहनवाज शफीज उम्मा आलम अब्दुल, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल शेख फय्याज बायपरवाला, ताला लिवाकत खान असे हे आरोपी आहेत. दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी हे चार आरोपी एनआयएच्या वॉटेंडच्या यादीत आहे.

7 आरोपींना केली अटक

NIA ने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे शहरातील कोंढवामध्ये एका घरात काम करत होते. याठिकाणी त्यांनी आयईडी असेंबल केले होते. तसेच बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. तसेच सातारा जंगलात जाऊन बॉम्बची चाचणी घेतली होती.

इसिस स्लीपर सेलचा शामिक सादील नाचन याच्या ठाण्यातील घरावरही एनआयएने तीन ऑगस्ट रोजी धाड टाकली होती. त्याला अटकही केली होती. ठाणे जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्यातून देशात विघटन करण्याचा दहशतवाद्यांचा कट उघड झाला होता. नाचनसह झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण यांच्यासह काही इतर संशयित हिंसाचार घडवण्याच्या कटात सहभागी होते, असे तपास संस्थेच्या तपासातून उघड झाले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?