
पुण्यातील रेव्ह पार्टीने राज्यातील राजकारण हादरले आहे. या धक्कादायक प्रकाराने राजकारणात वादाची लाट उसळली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅम्पवरून नाथाभाऊ आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली होती. भाजपचे आमदार ही या वादात खडसेंवर तुटून पडले होते. त्यातच मध्यरात्री सुरु झालेल्या रेव्ह पार्टीत नाथाभाऊंचा जावई प्रांजल खेवलकर याचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी इतर जणांसह त्यांना ताब्यात घेतले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान या पार्टीविषयीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आहे काय?
आतापर्यंत काय काय घडले?
पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. त्यावेळी भल्या पहाटे 3 वाजता पार्टीला सुरुवात झाल्याचे समोर आले. या ठिकाणी दारू, हुक्का, अंमली पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणात दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतले. त्यात नाथाभाऊंचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे मेडिकल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. पोलीस आयुक्तालयात या सर्वांना घेऊन आले आहे. पोलीसांनी कारवाईत सदर सदनिकेतून गांजा, कोकेन ताब्यात घेतल्याचे समोर आले. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या फ्लॅटची तपासणी करण्यात आली. त्यांचे लॅपटॉप, पेनड्राईव्ह ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
त्या व्हिडिओत काय?
दरम्यान या कारवाईचा आणि त्या संबंधित पार्टीचा एक एक व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. त्यात काही जण पार्टी करत असल्याचे दिसून येते. तर पोलिसांच्या मते येथे पैसे उधळण्यात आले. या ठिकाणी दारूचा मोठा साठा, अंमली पदार्थ आढळून आले. पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये पकडलेला एक जण क्रिकेट बुकी असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीला भल्या पहाटे ३ वाजता सुरुवात झाली. पार्टीमध्ये गांजा आणि कोकेन या अमली पदार्थांचे सेवन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासह ५ जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
छापेमारीला राजकीय वळण
या छापेमारीनंतर या सर्व प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या कारवाईवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही बाजूंनी ही कारवाई योग्य आहे की नाही, यावर खल करण्यात येत आहे. खडसे सातत्याने महाजन यांच्याविरोधात बोलत असल्यानेच ही कारवाई झाल्याचा दावा करण्यात येत आहे.