Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या

| Updated on: Jun 22, 2020 | 1:02 PM

पुण्यात केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन 36 वर्षीय महिलेने आपलं आयुष्य संपवलं (Pune Lady Suicide from Hospital Terrace)

Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या
Follow us on

पुणे : पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलावर केईएममध्येच उपचार सुरु असताना आईने टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Lady Suicide from Hospital Terrace)

केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन 36 वर्षीय महिलेने आपलं आयुष्य संपवलं. संबंधित महिला पुण्यातील वानवडी भागात राहत होती. सोमवारी सकाळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिच्या 13 वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयातच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा : पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास

दरम्यान, गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये दहा जणांनी आपली जीवनयात्रा संपवली.

19 जूनला पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तिशीतील दाम्पत्याने दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर स्वतःचंही आयुष्य संपवलं होतं. आर्थिक चणचण असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्याच दिवशी सिंहगड रोडवरील एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी रास्ता पेठेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या पतीने आत्महत्या केली, हा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही त्याच हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली.